मुंबई: आता रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळवणं आणखी सोपं झालं आहे. रेल्वेने रिझर्व्हेशन कोट्यातील 'डिस्टन्स रिस्ट्रिक्शन' अर्थात अंतरावरील मर्यादा हटवली आहे. त्याबाबत रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे.
डिस्टन्स रिस्ट्रिक्शन अर्थात अंतराची मर्यादा हटवल्यामुळे रेल्वे तिकीट कन्फर्म करणं सुलभ झालं आहे.
कन्फर्मेशन कोटा कसा निश्चित व्हायचा?
लांब पल्ल्याच्या रेल्वेंचं रिझर्व्हेशन अंतरावर ठरवलं जातं. जसे की, दिल्ली ते चेन्नई सेंट्रल या तामिळनाडू एक्स्प्रेसमध्ये रिझर्व्ह कोट्याची अंतर मर्यादा 600 किमी आहे. या रेल्वेचा रिझर्व्ह कोटा थेट भोपाळमध्ये आहे.
मधल्या प्रवासात ही रेल्वे आग्रा, ग्वाल्हेर आणि झांसी रेल्वे स्टेशनवर थांबते. अशावेळी मधल्या स्टेशन्सवर वेटिंग तिकीट पुल्ड कोट्यात जारी केला जातो.
पुल्ड कोट्यातील तिकीट जारी झाल्यानंतर, ते तिकीट तेव्हाच कन्फर्म होतात, जेव्हा या कोट्यातील अन्य तिकीट रद्द होतील.
अन्य कोट्यातील तिकीट कॅन्सल झाल्यानंतर, वेटिंग क्लिअर होत नाही.
आता कन्फर्म तिकीट मिळणं सोपं
सध्या देशभरात 'डिस्टन्स रिस्ट्रिक्शन' अर्थात तिकीटासाठी अंतराची मर्यादा असलेल्या रेल्वेंची संख्या हजारो आहे. त्यामुळे पहिल्या स्टेशनवरुन सुटलेल्या रेल्वेसाठी मधल्या एखाद्या स्टेशनवरुन तिकीट बुकिंग करणं मोठं जिकिरीचं काम असतं. मात्र आता ही अंतर मर्यादा हटवल्याने, प्रवाशांना जनरल वेटिंग देण्यात येईल, त्यामुळे वेटिंग तिकीट सहजासहजी कन्फर्म होईल.