नवी दिल्ली : बीएसएफ जवान तेजबहादूर यांच्यानंतर आता मथुरेतील सीआरपीएफच्या जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जीत सिंह असं या जवानाचं नाव असून त्याने या व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आपल्या समस्या मांडल्या आहेत.

VIDEO : काळीज पिळवटून टाकणारा BSF जवानाचा व्हिडीओ व्हायरल

तेज बहादूर यांनी जेवणासाठी आलेलं सामान वरिष्ठ अधिकारी बाजारात विकत असल्याचा आरोप केला होता. तरजीत सिंह यांनी या व्हिडीओद्वारे लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांना मिळणाऱ्या सुविधांमधील तफावतीवर बोट ठेवलं आहे. पेन्शनसह ज्या सुविधा लष्कराला मिळतात त्या सीआरपीएफच्या जवानांनाही मिळाव्यात, अशी मागणी जीतसिंह यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे

2 मिनिट 51 सेकंदाच्या या व्हिडीओत जीत सिंह म्हणतात, "मित्रांनो, मी कॉन्स्टेबल जीत सिंह. सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्सचा जवान आहे. मला तुमच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत एक संदेश पोहोचवायचा आहे. मित्रांनो, लष्कारालाही पेन्शन आहे. पण आम्हाला मिळणारी पेन्शनही बंद झाली आहे. 20 वर्षांनंतर निवृत्त झाल्यावर आम्ही काय करणार?"


सीआरपीएफचं व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण

हा व्हिडीओ सीआरपीएफच्या जवानाचाच आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. या जवानाची पोस्टिंग सध्या कुठे आहे, याचा आम्ही तपास करत आहे, असं सीआरपीएफने म्हटलं आहे.

जवानच बेशिस्त असल्याचा बीएसएफचा आरोप


व्हिडीओनंतर जीत सिंह यांच्यावर दबाव टाकला?

मूळचे मथुराचे असलेले जीत सिंहने 2012 मध्ये सीआरपीएफमध्ये सामील झाले होते. या व्हिडीओसंदर्भात एबीपी न्यूजने जीत सिंह यांच्याशी संपर्क साधला. व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यांच्यावरही दबाव टाकला का, या प्रश्नावर ते म्हणाले की, माझी तक्रार अधिकाऱ्यांबाबत नाही तर सरकारबाबत आहे.

'मी बेशिस्त होतो तर मला पुरस्कार का दिले', जवानाचा बीएसएफला सवाल



पाहा व्हिडीओ