लखनऊ : भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि चीनलाही कळू लागलंय की भारत कमकुवत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. लखनऊमधील भारतीय लोधी महासभेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
“भारताच्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि चीनलाही कळू लागलंय की, भारत आता कमकुवत राहिला नाही. भारताची ताकद वाढलीय.”, असे राजनाथ सिंह यांनी डोकलाम विषयावर बोलताना सांगितले.
“जेव्हापासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार बनलं आहे, तेव्हापासून भारत जगात ताकदवान देश बनला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.”, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. ते म्हणाले, “पाकिस्तान भारतात दहशतवाद्यांना पाठवतो. ते भारताला तोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र आपले सुरक्षा दल रोज दोन-चार दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.”
चीनलाही कळू लागलंय, भारताची ताकद वाढलीय : राजनाथ सिंह
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Oct 2017 07:57 PM (IST)
“जेव्हापासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात सरकार बनलं आहे, तेव्हापासून भारत जगात ताकदवान देश बनला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.”, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -