शपथविधीनंतर योगी आदित्यनाथ यांनी बैठका घेणं सुरु केलं. आज त्यांनी उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव यांच्यासोबत चर्चा केली. उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिेले आहे. योगी आदित्यनाथ यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या सचिवांशी देखील चर्चा केली.
दरम्यान, आजपासून योगी आदित्यनाथ यांनी आपला मुक्काम आजपासून मुख्यमंत्र्यांसाठी असलेल्या शासकीय बंगल्यात हलवला आहे.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच योगी आदित्यनाथ यांनी पाच गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं आहे. आदित्यनाथ यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना 15 दिवसात संपत्तीचा तपशील देण्यास सांगितलं आहे. शिवाय भाजपच्या जाहीरनाम्यातील गोष्टी अजेंड्यावर असतील, असंही स्पष्ट केलं.
‘’संपत्तीचा तपशील सार्वजनिक करा’’
योगी आदित्यनाथ यांची शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रिमंडळासोबत बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. सर्व मंत्र्यांना आपली संपत्ती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले असल्याचं आदित्यनाथ यांनी सांगितलं.
तरुणांना रोजगार
उत्तर प्रदेशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहिल, असंही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केलं. भाजपच्या जाहीरनाम्यातील घोषणा पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं जाईल, असंही ते म्हणाले.
‘’वादग्रस्त वक्तव्य करु नका’’
सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या मंत्र्यांना वादग्रस्त वक्तव्य करणं टाळावं, असाही सल्ला दिला आहे.
दोन प्रवक्त्यांची नियुक्ती
आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांची प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीकांत शर्मा आणि सिद्धार्थ नाथ सिंह हे भाजपचे प्रवक्त म्हणून काम पाहतील.
ग्रामीण भागाला प्राधान्य
उत्तर प्रदेशातील शेती आणि शेतकऱ्यांचा विकास करणं सरकारची प्राथमिकता असेल, असं आदित्यनाथ यांनी सांगितलं. शिवाय ग्रामीण भागाच्या विकासासाठी योजना बनवल्या जातील, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्याच दिवशी पाच घोषणा
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील 46 चेहरे कोण?
शपथविधीपूर्वी योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांची सडकून टीका
योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान
योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात एकमेव मुस्लीम चेहरा