मुंबई: पद्म पुरस्काराच्या निवडप्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. देशातील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी आता सर्वसामान्यांनाही शिफारस करण्याची सुविधा केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

सर्वसामान्य नागरिकांना त्यासाठी त्यांचे आधार कार्ड असणं आवश्यक असणार आहे. तसेच यासाठी ऑनलाईन पद्धतीनं हे नामनिर्देश मागवण्यात आले आहेत.

 

पद्म पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लॉबिंग होत असून कर्तृत्व नसलेल्यांनाही हा सन्मान दिला जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पुरस्काराची निवड प्रक्रिया खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

दरम्यान, पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असून यासाठी आतापर्यंत 1 हजार 700 नामांकने प्राप्त झाली आहेत.