नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये खासगी कंपन्यांतील कामगारांचा संताप अखेर उफाळून आला असून पगारवाढ, महागाई आणि वाढत्या घरभाड्याच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन उभं राहिलं आहे. सुरुवातीला शांततेत सुरू असलेलं आंदोलन अचानक हिंसक झालं आणि अनेक ठिकाणी तोडफोड, दगडफेक आणि वाहनांना आग लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

Continues below advertisement

नियमानुसार 8 तासांचे काम असते, मात्र कंपन्यांकडून 10 ते 12 तास राबवून घेतलं जातं. तसेच या ओव्हरटाईमचा पगारही दिला जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. नोएडासारख्या शहरात किमान 18 ते 20 हजार रुपये पगार असावा, तरच किमान जीवन जगता येईल असं मत आंदोलक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं.

Noida Salary Hike Protest : ओव्हरटाईम करण्यासाठी शिवीगाळ

ओव्हरटाईम करण्यास नकार दिला तर कंपनीचे अधिकारी शिवीगाळ करतात, अपमान करता अशी तक्रारही कर्मचाऱ्यांनी केली. ओव्हरटाईमचे पैसेही दिले जात नाहीत. कंपन्यांच्या इतर स्टाफचे वेतन दरवर्षी हजारोंमध्ये वाढतं, मात्र आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांना मात्र 100 ते 200 रुपयांची वाढ दिली जाते, असा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला.

Continues below advertisement

Salary Crisis Noida : 11 हजारात कसं जगायचं? कामगारांचा सवाल

कामगारांनी सांगितलं की, 10 ते 11 हजार रुपयांच्या पगारात शहरात राहणं अशक्य झालं आहे. “4 हजार रुपये गॅस सिलेंडरवर जातात, घरभाडं वेगळं, मुलांचं शिक्षण वेगळं... मग जगायचं कसं?” असा सवाल एका महिला कर्मचाऱ्याने केला. वाढत्या महागाईमुळे रोजचा खर्च भागवणंही कठीण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Living Cost Pressure : भाडं, प्रवास आणि महागाईचा तिहेरी फटका

कामगारांच्या मते, फक्त गॅसच नाही तर घरभाडं आणि प्रवास खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलाय. ई-रिक्षाचं भाडं दुप्पट झालं असून रोजच्या छोट्या-छोट्या खर्चांनीही खिसा रिकामा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेकांनी 10-12 तास काम करूनही योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप केला.

Violence in Protest : आंदोलन का हिंसक झालं?

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन दुर्लक्षित राहिल्यानं कामगारांचा रोष वाढला. अखेर रस्त्यावर उतरलेल्या जमावाने दगडफेक, तोडफोड आणि वाहनं जाळण्याचे प्रकार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि वाहतूक व्यवस्थाही कोलमडली.

Workers Demands : कामगारांच्या मुख्य मागण्या काय?

कामगारांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत:

  • किमान वेतन वाढवणं
  • ओव्हरटाइमला दुप्पट मोबदला
  • साप्ताहिक सुटी अनिवार्य
  • वेळेवर पगार
  • कामाच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुविधा.

या मागण्यांवर प्रशासनाने चर्चाही सुरू केली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Administration Action : प्रशासन हरकत, उपाययोजना सुरू

स्थिती बिघडताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. प्रशासनाने कामगार आणि कंपन्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी बैठक घेतली असून कामगारांसाठी नवीन नियम लागू करण्याचे संकेत दिले आहेत.

ही बातमी वाचा: