नवी दिल्ली : रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगवर मार्च 2018 पर्यंत सर्व्हिस चार्ज आकारला जाणार नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ऑनलाईन रेल्वे बुकिंगसाठी सर्व्हिस चार्ज न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
सुरूवातीला या सुविधेचा लाभ 30 जूनपर्यंत आणि त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र आता मार्च 2018 पर्यंत सर्व्हिस चार्ज न भरता तुम्हाला रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बूक करता येणार आहे.
रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बूक करण्यासाठी 20 ते 40 रुपये सर्व्हिस चार्ज आकारला जातो. मात्र ऑनलाईन व्यवहाराला चालना देण्यासाठी रेल्वेने हे शुल्क रद्द केलं होतं. मार्च 2018 पर्यंत प्रवाशांना ही सुविधा आता मिळणार आहे.
मोबिक्वीक आणि आयआरसीटीसीची भागीदारी
डिजीटल पेमेंट कंपनी मोबीक्वीकने रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा देण्यासाठी आयआरसीटीसीशी भागीदारी केली आहे. तुम्ही आता मोबीक्वीकच्या माध्यमातूनही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे तिकीट बूक करु शकता.
IRCTC च्या ऑनलाईन तिकीट बुकिंगवर मार्च 2018 पर्यंत शुल्क नाही!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Oct 2017 08:22 AM (IST)
नोटाबंदीनंतर रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटावरील चार्ज रद्द करण्यात आला होता. ही सुविधा आता मार्च 2018 पर्यंत मिळणार आहे.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -