नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना 'भारतरत्न' देण्यासाठी शिफारसीची गरज नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा खुलासा करण्यात आला आहे.
अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हा महत्त्वाचा खुलासा केला. केंद्राकडे भाररत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारसी केल्या जातात. मात्र भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता नाही. शिफारशी शिवाय देखील हा पुरस्कार दिला जातो. भारतरत्न देण्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय घेण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे. मात्र काँग्रेसचा या मागणीला विरोध आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जाहीरनाम्यातदेखील सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी महाराष्ट्र सरकार शिफारस करेल असं नमूद करण्यात आलं होतं. भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला पाहिजे? या विषयीचे सर्व हक्क पंतप्रधान कार्यालयाकडे राखीव असतात. पंतप्रधान कार्यालयाच्या निर्णयानुसार जी व्य्कती या पुरस्कारासाठी योग्य पात्रतेची वाटते त्या व्यक्तीला सरकार पुरस्कार देते. त्यामुळे हा पुरस्कार देण्यासाठी शिफारशीची आवश्यकता नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारसीची गरज नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2019 08:12 PM (IST)
अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने हा महत्त्वाचा खुलासा केला. केंद्राकडे भाररत्न पुरस्कार देण्यासाठी शिफारसी केल्या जातात. मात्र भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -