केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी जाहीर केलं होतं की, लवकरच 1000 रुपयांची नवी नोट नव्या सुरक्षा मानंकासह येणार आहे. यानंतरच 1000ची नोट देखील बाजारात येणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण याबाबत अर्थमंत्री जेटलीनं स्पष्टीकरण देत 1000ची नोट येणार नसल्याचं सांगितलं.
यावेळी बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, '22500 एटीएममध्ये नव्या नोट्यांसाठी बदल करण्यात येणार आहे. यानंतर एटीएममधून 500 आणि 2000च्या नोटा मिळतील.'
यावेळी बोलताना अर्थमंत्री जेटली म्हणाले की, 'जुन्या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास सहकारी बँकांना कदापि परवानगी देणार नाही. सहकारी बँकांना नोटा बदलण्याची परवानगी दिली तर या बँका काळा पैसा पांढरा करण्याचं केंद्र बनतील.'
रिझर्व्ह बँकेनं १४ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ही बंदी घातली होती. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांचं जाळं नाही. त्यामुळे सहकारी बँकांवरील ही बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यासाठी कोर्टात याचिकाही टाकण्यात आलीय. शिवाय काल शिवसेनेनं यासंदर्भात राष्ट्रपतींकडे मागणी केली. मात्र सरकारनं सर्वांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
संबंधित बातम्या:
सहकारी बँकांना नोटा बदलीची परवानगी नाहीच : जेटली
बोटावर शाई नको, निवडणूक आयोगाचं केंद्रीय अर्थ विभागाला पत्र
'सहकारी बँकांबाबत आजच निर्णय घ्या, अन्यथा उद्यापासून बँका बंद'
बँकांबाहेरील रांगांचं नेमकं कारण काय?
'सर्जिकल स्ट्राईक 2' ची तयारी, स्थावर मालमत्ता रडारवर
पेट्रोल पंपावरही पैसे काढता येणार, रांगा कमी करण्यासाठी नवा उपाय!
ICICI-HDFC बँकांकडून ठेवींच्या व्याजदरात कपात
नोटबंदीचा दहावा दिवस, मोदी सरकारचे महत्त्वपूर्ण निर्णय