Nupur Sharma Case : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर टीका केल्याबद्दल माजी न्यायाधीश आणि वकिलाविरुद्ध अवमान खटला चालणार नाही, अॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी माजी न्यायाधीश आणि वकिलाविरुद्धच्या अवमानाच्या कारवाईला संमती देण्यास नकार दिला आहे. अॅटर्नी जनरल यांनी ही टिप्पणी वाजवी आणि न्याय्य असल्याचे म्हटले आहे.
प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्या विरोधात टिप्पणी केल्याच्या आरोपावरून नोंदवण्यात आलेला खटला एकत्र करण्याच्या नुपूर शर्मांच्या (Nupur Sharma) याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कठोर टीका केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एसएन धिंग्रा, माजी एएसजी अमन लेखी आणि ज्येष्ठ वकील के राम कुमार यांच्याविरुद्ध अवमानाची कारवाई सुरू करण्यासाठी वकील सीआर जयसुकिन यांनी अॅटर्नी जनरलकडून संमती मागितली होती.
अवमानासाठी अॅटर्नी जनरलची संमती आवश्यक आहे
अवमानाच्या बाबतीत, कायदा म्हणतो की त्यासाठी अॅटर्नी जनरलची संमती आवश्यक आहे. न्यायिक कार्यवाहीवर न्याय्य टीका केल्यानंतर न्यायालयाचा अवमान होणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा मान्य केले आहे. या तिघांच्या टिप्पण्या आक्षेपार्ह नाहीत, असे अॅटर्नी जनरल यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींनीही टीका केली
नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्ये प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने टिप्पणी केली होती की, देशात जे काही घडत आहे त्याला त्याला नुपूर शर्मा एकट्या जबाबदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या या टीकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एस एन धिंग्रा आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांसह अनेक माजी न्यायाधीशांनी टीका केली होती.
देशभरात नोंदवलेल्या केसेस क्लब करण्याची मागणी केली होती
प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर बंगालसह अनेक राज्यांमध्ये नुपूर शर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांबाबत नुपूर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शर्मा यांनी देशभरात आपल्या विरोधात नोंदवलेली एफआयआर क्लब करून दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. 1 जुलै रोजी सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांची याचिका फेटाळून लावत भाजपच्या निलंबित नेत्यावर सडकून टीका केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या