Amarnath Yatra 2022 : खराब हवामानामुळे (Amarnath Yatra 2022 ) बालटाल (Baltal) आणि पहलगाम (Pahalgam) या दोन्ही ठिकाणांहून अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. असे असतानाही या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही. दरम्यान, यात्रेकरूंनी मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या अमरनाथ यात्रेवरील राजकीय वक्तव्याचा निषेध केला आहे. 


पुढील सूचना मिळेपर्यंत यात्रा थांबवण्यात आली
सध्या खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेला बालटाल आणि पहलगाम या दोन्ही ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार पुढील सूचना मिळेपर्यंत यात्रा थांबवण्यात आली आहे.


मेहबुबा मुफ्ती यांचा भाजपवर आरोप
पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी केंद्र सरकारवर आरोप केलेत. त्या म्हणाल्या, एका समितीने शिफारस केल्यानंतर संख्येपेक्षा जास्त भाविकांना परवानगी देऊन अमरनाथ यात्रेला “राजकीय मुद्दा” बनवल्याचा आरोप केला होता. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर एका दिवसात पाच हजाराहून अधिक श्रद्धाळू अमरनाथच्या पवित्र गुहेत जाऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले होते.


अधिक भाविकांमुळेच ढगफुटी - मुफ्ती
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, एका दिवसात हजारो लोकांना अमरनाथच्या पवित्र गुहेत पाठवले जात आहे, त्यामुळे ढगफुटीची घटना घडली. ढगफुटीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांची खरी संख्या प्रशासनाने लपवून ठेवली आहे आणि ते असे का करत आहेत हे आम्हाला माहीत नाही, असा आरोपही मुफ्ती यांनी केला.


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rain Updates : राज्यात अतिवृष्टीचा इशारा; अनेक ठिकाणी शाळा बंद, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा रद्द


Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, अनेक ठिकाणी 'रेड अलर्ट' जारी


Mumbai Rains : मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; विद्यापीठाच्या आजच्या परीक्षा रद्द, नवीन तारखा लवकरच जाहीर करणार 


Dombivali News : वाहतूक पोलीस हवालदाराला चारचाकीने नेले फरफटत, डोंबिवलीतील धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद