मुंबई : रिलायन्स जिओने इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी इंटरकनेक्ट युसेज चार्ज(IUC) लागू केला आहे. बुधवारी कंपनीने त्याबाबतची घोषणा केली. त्यामुळे जिओ युजर्सना धक्का बसला. कालपासून सर्वत्र रिलायन्स जिओला ट्रोल केले जाऊ लागले आहे. त्यानंतर आज वोडाफोन आयडिया लिमिटेड Vodafone Idea Limited (VIL) ने आययूसीसंदर्भात (IUC) मोठी घोषणा केली आहे.

वोडाफोन आयडियाकडून सांगण्यात आले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांकडून इतर कॉल्सच्या बदल्यात अतिरिक्त पैसे आकारणार नाही. वोडाफोन-आयडियाकडून वेगळे आययूसी चार्जेस आकारले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या फ्री ऑऊटगोईंग सुविधेचा आनंद घ्या.

काय आहे इंटरकनेक्ट युसेज चार्ज (IUC)?
इंटरकनेक्ट युसेज चार्ज अथवा IUC म्हणजे एका मोबाईल टेलिकॉम ऑपरेटरद्वारे दुसऱ्या ऑपरेटर कंपनीला दिले जाणारे शुल्क आहे. जेव्हा एका कंपनीचे ग्राहक त्याच कंपनीच्या नेटवर्कला सोडून अन्य कंपनीच्या नेटवर्कवरील ग्राहकाला फोन करतात, तेव्हा कॉल करणाऱ्या ग्राहकाच्या कंपनीला दुसऱ्या कंपनीला हे शुल्क द्यावे लागते.

दोन भिन्न नेटवर्क कंपन्यांमधील या कॉलला मोबाईल ऑफ-नेट कॉल म्हणून ओळखलं जातं. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)द्वारे या IUCचं शुल्क ठरवलं जातं, जे सध्या 6 पैसे प्रति मिनिट आहे.


व्हिडीओ पाहा