नवी दिल्ली : लोकसभेत तीन तलाक विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे. हे विधेयक आजच पास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. या विधेयकासाठी सध्या मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जात आहे. परंतु त्यापूर्वीच भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या जेडीयूने (जनता दल युनायटेड) या विधेयकाला विरोध केला आहे. संसदेतील जेडीयूच्या प्रतिनिधींनी विधेयकाला विरोध करत सभात्याग केला.
जेडीयूचे मुंगेर मतदार संघातील खासदार ललन सिंह तीन तलाक विधेयकाला विरोध करत म्हणाले की, या विधेयकामुळे समाजात अविश्वास निर्माण होईल. आम्ही भाजपचे सहयोगी आहोत, परंतु कलम 370, समान नागरी कायदा आणि राम मंदिराबाबत आमचे विचार त्यांच्यापेक्षा वेगळे आहेत. तीन तलाकची समस्या सोडवण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जन जागृतीद्वारे समस्या सोडवायला हव्यात.
ललन सिंह म्हणाले की, हा समाज कडक नियमांनी चालत नाही. समाजाकडे स्वतःचे काही नियम आहेत. यापूर्वीदेखील बनवण्यात आलेल्या अनेक कायद्यांचा गैरफायदा उचलला गेला आहे. तीन तलाकसारखे कायदे झाले तर समाजातील काही लोक त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतील.
पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत जेडीयूला मुस्लीम समाजाची मतं हवी आहेत. त्यामुळेच जेडीयूचे नेते आत्ता तीन तलाक विधेयकाला विरोध करुन मुस्लीम मतदारांमध्ये स्वतःच्या पक्षाबाबत सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Triple Talaq Bill : इस्लाममध्ये लग्न म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, त्याला सात जन्मांचा मुद्दा बनवू नका : असदुद्दीन ओवेसी
भाजपला दणका; तीन तलाक विधेयकाला विरोध करत नितीश कुमारांच्या जेडीयूचा सभात्याग
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2019 06:58 PM (IST)
लोकसभेत तीन तलाक विधेयकावर सध्या चर्चा सुरु आहे. हे विधेयक आजच पास करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -