गोवा : लहान मुलाला मारहाण करणाऱ्या आणि त्याच्या अल्पवयीन बहिणीचा विनयभंग करणाऱ्या नऊ पर्यटकांना कळंगुट पोलिसांनी अटक केली आहे. हे सगळेजण पुण्यातील आहेत. ही घटना 29 मे रोजीची बागा बीचवर घडली. तक्रारदाराच्या माहितीनुसार बागा बीचवर असलेल्या शॅकमध्ये ते बसले होते. त्यांचा मुलगा आणि मुलगी बीचवर फेरफटका मारत होते. यावेळी 11 जणांचा एक गट आला आणि त्यांनी मुलीचे फोटो काढायला सुरुवात केली. तिच्या भावाने याला आक्षेप घेतला असता या टोळक्याने त्याला मारहाण केली. तक्रार नोंदवल्यानंतर हे आरोपी पळून जाण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी त्याआधीच आरोपींना अटक केली. यातील दोन आरोपी अल्पवयीन असून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची रवानगी मरेशी बालसुधागृहात केली आहे. उर्वरीत आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत
  • रमेश कांबळे
  • संकेत भडाळे
  • कृष्णा पाटील
  • सत्यम लांबे
  • अनिकेत गुरव
  • ह्रषिकेश गुरव
  • आकाश सुवसकर
  • सन्नी मोरे
  • ईश्वर पांगारे