मुंबई : एनआयएनं (NIA)  आयसीसवर मोठी कारवाई केली आहे. एनआयएनं देशभरात 44 जागांवर एनआयएनं धाडी टाकल्या आहेत. पुणे दहशतवादी प्रकरणात (Pune Terrorist Case)  शामिल नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आलीय. महाराष्ट्र एटीएसच्या (Maharashtra ATS)  मदतीने एनआयएने 13 ते 14 जणांना ताब्यात घेतलंय. तसंच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे. 


पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचनला व अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती.  त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. भिवंडीच्या पडघा गावात एनआयएची मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने काही लोकांना ताब्यात  घेतले. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने 13 ते 14 लोकांना ताब्यात  घेतले आहे. पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होता.


कर्नाटकातही छापेमारी सुरू


पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात  अटक आली होती. एनआयएने आता आणखी काही लोकांना ताब्यात घेतले. पुण्यात दोन ठिकाणी, ठाणे ग्रामीणच्या पडघा इथे 41 ठिकाणी  तर कर्नाटक, बंगलोर ला एक ठिकाणी ही छापेमारी सुरु आहे. कर्नाटकातही छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे.  शाहनवाज नावाच्या अटक आरोपीचा संबंधीत ठिकाणी हि छापेमारी करण्यात आली आहेत.


दहशतवादी कारवाया करण्याचा रचला होता कट


आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. तसेच एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस  हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे.   भारतामध्ये ISIS च्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झालं आहे.


ISIS, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे. 


हे ही वाचा :