New Year 2020 | नवीन वर्ष, नवीन नियम; वाचा आजपासून काय-काय बदलणार?
एनईएफटी ट्रान्जक्शवर कोणत्याही प्रकारचा चार्ज आजपासून लागणार नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्टेट बॅक ऑफ इंडियाकडून रेपो रेट शी संबंधित कर्जाच्या व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे.
आजपासून सोन्या-चांदीच्या दागिण्यांवर हॉलमार्क अनिवार्य असणार आहे.
स्टेट बॅकेचं जुनं मॅग्रेटिक स्ट्राइप कार्ड आजपासून बंद होणार आहे. बॅकेचं नव्या प्रणालीचे ईएमव्ही चीप असलेलं कार्ड फक्त सुरु राहणार आहे.
आधारकार्ड पॅनकार्डला लिंक करण्यासाठी मार्च 2020 पर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.
रेल्वेच्या तिकीट दर आजपासून वाढणार आहेत. ही दरवाढ जास्तीत जास्त 4 पैशांची असणार आहे. नॉन एसी सेकेंड क्लास, स्लीपर क्लास, फर्स्ट क्लासचं भाडं प्रति किमी 1 पैशांनी वाढणार आहे.
रेल्वेचा इतर सर्व हेल्पलाईन क्रमांक बंद होणार असून आजपासून रेल्वेचा 139 हा एकच हेल्पलाईन नंबर असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -