New Rules from 1st November : ऐतिहासिक उंची गाठणाऱ्या महागाईमुळं सर्वसामान्य हैराण झाले आहेत. अशातच आज, 1 नोव्हेंबरपासून देशात अनेक मोठे बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसण्यासोबतच आयुष्यावरही परिणाम होणार आहे. आजपासून बँकेत पैसे जमा करण्यापासून ते बँकेतून पैसे काढण्यासाठीही काही पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच रेल्वे टाइम-टेबलमध्येही बदल करण्यात आले आहेत. तर गँस सिलेंडर बुकिंग, व्हॉट्सअॅपमध्येही बदल होणार आहेत.


बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि बँकेतून रक्कम काढण्यासाठीही शुल्क 


आजपासून बँकिंगच्या अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. आता कोणत्याही खातेधारकाला बँकेत पैसे जमा करण्यासाठी आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी काही शुल्क आकारण्यात येणार आहे. या बदलाची सुरुवात बँक ऑफ बडोदानं केली आहे. BOB नं दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या नोव्हेंबरपर्यंत निर्धारित मर्यादेहून अधिक बँकेतून पैसे काढले किंवा भरले तर वेगळं शुल्क आकारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी (लोन खातं) 150 रुपये भरावे लागणार आहेत. 


नव्या नियमांनुसार, सेविंग अकाउंटमध्ये तीन वेळा पैसे भरणं मोफत असणार आहे. परंतु, जर अकाउंट होल्डरनं एका महिन्याच्या आत तीनपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर मात्र त्यांना 40 रुपयांचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल. दरम्यान, हा नियम जनधन खातेधारकांसाठी लागू असणार नाही. त्यांनी तीन पेक्षा जास्त वेळा बँकेत पैसे भरण्यासाठी कोणतंही इतर शुल्क भरावं लागणार नाही, तर पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील. 


स्वयंपाक घरातील सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल 


ऐन दिवाळीच्या तोंडावर एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. आधीच कोरोना संकट आणि इंधन दरवाढीमुळे हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एक नोव्हेंबर रोजी कमर्शिअल सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या वाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीमध्ये 19 किलो वजनाच्या कमर्शिअल सिलिंडरची किंमत दोन हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.  


रेल्वेच्या वेळापत्रकात बदल 


आजपासून भारतीय रेल्वे (Indian Railway) च्या वेळापत्रकात बदल होणार आहे. यापूर्वी टाइम टेबल 1 ऑक्टोबरपासून बदलणार होतं. परंतु, काहीतरी कारणास्तव ही तारिख पुढे ढकलण्यात आली असून 1 नोव्हेंबर करण्यात आली. पुढच्या महिन्याच्या सुरुवातीपासून ट्रेनचं नवं टाईम-टेबल लागू करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, नव्या वेळापत्रकानुसा, 13 हजार पॅसेंजर ट्रेन आणि 7 हजार मालगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त देशात चालणाऱ्या जवळपास 30 राजधानी ट्रेन्सचं वेळापत्रक बदलणार आहे. 


गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी ओटीपी आवश्यक 


गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी आता योग्य पत्ता आणि फोन क्रमांक अत्यंत आवश्यक असणार आहे. नव्या नियमांनुसार, गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना त्यांच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP पाठवण्यात येणार आहे. OTP शिवाय गॅस सिलेंडरचं बुकिंग करणं अशक्य असणार आहे. तसेच सिलेंडर घरपोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला OTP सांगितल्यानंतरच ग्राहक सिलेंडर घेऊ शकणार आहेत. दरम्यान, नव्या सिलेंडर डिलिव्हरी पॉलिसी अंतर्गत चुकीचा पत्ता आणि मोबाईल नंबर देणाऱ्या ग्राहकांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे कंपन्यांनी यापूर्वीच सर्व ग्राहकांना आपलं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. 


'या' मोबाईल्समध्ये Whatsapp होणार बंद 


1 नोव्हेंबरपासून काही फोन्समध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. याचं सर्वात मोठं कारण आहे की, 1 नोव्हेंबर 2021 पासून व्हॉट्सॅप केवळ त्याच स्मार्टफोन्समध्ये चालणार आहे, ज्यामध्ये Android 4.1, iOS 10, KaiOS 2.5.0 काम करणार आहे. व्हॉट्सॅपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता 4.0.3 Ice Cream Sandwich, iOS 9 आणि KaiOS 2.5.0 वर व्हॉट्सअॅप सपोर्ट मिळणार नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :