Process for Applying for New Gas Connection : एक काळ होता जेव्हा भारतात लोक लाकडांच्या साहाय्याने चुलीवर जेवण बनवले जायचे. पण, बदलत्या काळानुसार लोकांच्या जीवानात बदल होत गेले. आता चुलीची जागा एलपीजी सिलेंडरने घेतली आहे. आज गाव असो किंवा शहर प्रत्येकजण एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) वापर करू लागले आहेत. या प्रयोगामुळे पर्यावरणाचे संरक्षण (Protect Environment) करण्यास मदत झाली. या बदलत्या प्रयोगामुळे आता नवीन गॅसचे कनेक्शन (New LPG Gas Connection)घेणं फार सोपं झालं आहे.
इंडियन गॅस सर्विसने आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या ऑनलाईन गॅस कनेक्शन (Apply Online Gas Connection) सेवा सुरू केली आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमचा सिलेंडर बुक करू शकता. ऑनलाईन गॅसची प्रक्रिया कशी ते जाणून घ्या.
अशा पद्धतीने अप्लाय करा ऑनलाईन गॅस कनेक्शन :
- नवीन एलपीजी गॅसच्या कनेक्शनसाठी तुम्ही एलपीजीच्या ऑफिशियल वेबसाईटवर (Official Website)जा.
- इथे तुम्हाला नवीन ग्राहक रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करायचे आहे.
- यानंतर एक फॉर्म तुमच्यासमोर येईल. तो तुम्ही व्यवस्थित भरायचा आहे.
- या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, राज्य, जिल्हा, शहर इ..तपशील भरायचे आहेत.
- यानंतर तुमचा मोबाईल नंबर, आयडी प्रूफ, ईमेल आयडी आणि पासच्या वितरकाचे नाव यासारखे तपशील भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवर व्हेरिफिकेशन कोड (Verified Code)येईल. यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल.
- या फॉर्मची प्रिंट आऊट काढून वितरकाकडे जावे.
- यानंतर गॅस कनेक्शनचे पैसे जमा करा.
- इथे तुमची बुकिंग प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्हाला घरपोच गॅस कनेक्शन मिळेल.
हे ही वाचा :
- Railway Jobs 2022: सरकारी नोकरीची संधी! भारतीय रेल्वेत क्रीडा कोट्याअंतर्गत भरती, लगेच करा अर्ज
- Omicron variant : ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ, आत्तापर्यंत देशात 6 हजार 41 रुग्णांची नोंद
- HUL Product : सर्वसामान्यांना महागाईचा फटका! साबण आणि डिटर्जंट पावडरच्या किंमतीत मोठी वाढ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha