पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी बेलूर येथील मठाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित तरुणांशी संवाद साधला. सुधारित नागरिकत्व कायद्यापासून देशातील नागरिकांना कुठलाही धोका नाही. विरोधक उगाच याबद्दल गैरसमज पसरवत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.
नागरिकत्व कायदा हा नागरिकत्व काढून घेण्याचा कायदा नाही. तर, नागरिकत्व देण्याचा कायदा आहे. सुधारित नागरिकत्व कायदा हा मूळ कायद्यात केवळ एक सुधारणा आहे. काही लोक सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी अफवा पसरवत आहे. मात्र, आजचा युवक सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानात दुसऱ्या धर्मियांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी जगभरातून युवक आवाज उठवत आहे, याचा मला आनंद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायदा हा एका रात्रीतून आणलेला कायदा नाहीये. खूप विचार विनीमय केल्यानंतर हा कायदा आणण्यात आला आहे. मात्र, काही लोकांना हे माहिती असूनही केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करत आहे. उत्तर पूर्वेतील राज्य आमचा गर्व आहे, तिथली संस्कृती, प्रथा-परंपरा, लोकसंख्या यावर या कायद्याचा कोणताही दुष्परिणाम होणार नसल्याचे मोदींनी स्पष्ट केले.
कोलकाता पोर्ट ट्रस्टचं नाव बदलंलं -
कोलकाता पोर्ट ट्रस्टचं नाव बदलल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. श्यामाप्रसाद मुखर्जी असं आता नवीन नाव कोलकाता पोर्ट ट्रस्टला देण्यात आलं आहे.
सीएए मागे घेण्याची ममतांची मागणी
पंतप्रधान मोदींनी शनिवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका मांडली. सीएए मागे घेण्याच्या ममता बॅनर्जींच्या मागणीवर दिल्ली येथे येऊन बोलण्यास पंतप्रधानांनी सांगितले. ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'पंतप्रधान आणि देशाचे राष्ट्रपती यांचे स्वागत करणे हे माझे घटनात्मक कर्तव्य आहे. बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे स्वागत केले. मी माझ्या दोन्ही मागण्या बैठकीत ठेवल्या.
संबंधित बातमी - काँग्रेसशासित राज्यांमधील विधिमंडळात सीएएविरोधात कायदेशीर ठराव मंजूर करणार
Special Report | सीएए, जोएनयू प्रकरणावर फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचं परखड मत | ABP Majha