नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा (NEET) 2021 चे आयोजन 12 सप्टेंबरला करण्यात आले आहे.  मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी हजारो विद्यार्थी करत होते. मात्र, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे आतापर्यंतच्या माहितीनुसार NEET UG 2021 ठरलेल्या वेळेतच देशभरात होणार आहे. 


दरम्यान NTA ने परीक्षेसाठी विशिष्ट ड्रेस कोड लागू केला आहे. जे विद्यार्थी हा ड्रेस कोड फॉलो करणार नाही त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे दागिने, धातूच्या वस्तू, मोबाईल फोन घेऊन जाता येणार आहे. 


जाणून घेऊया NEET 2021 परीक्षेसाठी   NTA ने कोणता ड्रेस कोड दिला आहे.


NEET 2021 मुलींसाठीचा ड्रेस कोड



  • मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे

  • महिला विद्यार्थ्यांनी फुल हाताचे कपडे, एम्ब्रायडरी, ब्रोच किंवा मोठ्या बटणाचे कपडे घालू नये.

  • उंच टाचेचे बूट आणि मोठे खिसे असलेली जीन्स घालू नये.

  • तसेच दागिने, कानातील झुमके, अंगठ्या, बांगड्या, नाकात चमकी, पायात पट्ट्या घालू नये. 


NEET 2021 मुलांसाठीचा ड्रेस कोड



  • मास्क आणि ग्ल्व्हज् घालणे बंधनकारक आहे

  • पुरुष विद्यार्थ्यांना अर्ध्या हाताचे शर्ट, टी-शर्ट घालण्यास परवानगी आहे. नीट परीक्षेत संपूर्ण बाह्याचे शर्ट घालण्यास परवानगी नाही.

  • परीक्षेची मोठ्या खिशांच्या, मोठ्या बटणाचे कपडे घालण्यास परवानगी नाही

  • पुरुष विद्यार्थ्यांना ट्राउजर घालण्यास परवानगी आहे.


एकाच महिन्यात येणाऱ्या परीक्षा : 



  • ICAR AIEEA 2021 UG (BSc प्रवेशांसाठी): 7, 8, 13 सप्टेंबर

  • कर्नाटक कॉमेडक: 14 सप्टेंबर

  • ओडिशा JEE: 6 ते 18 सप्टेंबर


प्रवेशपत्र 9 सप्टेंबरला मिळणार
NEET UG परीक्षेचे प्रवेशपत्र हे 9 सप्टेंबरला, म्हणजे परीक्षेच्या आधी तीन दिवस एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. 


परीक्षा केंद्राची माहिती कशी घ्यायची? 



  • सर्वप्रथम NTA च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या- neet.nta.nic.in

  • संकेतस्थळावर आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि पासवर्ड टाकावा. 

  • त्यानंतर Submit वर क्लिक करावं आणि एक्झाम सेंटर सिटी तपासावं.   


NEET UG परीक्षा 13 भाषांमध्ये होणार 
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश परीक्षा  NEET UG परीक्षा आता पहिल्यांदाच हिंदी, मराठी, पंजाबी, आसामी, बंगाली, उडिया, गुजराती, तेलुगु, मल्याळम, कन्नड, तामिळ, उर्दू आणि इंग्रजी अशा तेरा भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 


संबंधित बातम्या :


NEET-UG 2021 Update: NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षा ठरल्या तारखेलाच होणार