NCPCR Instagram Account: नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने फेसबुकला पत्र लिहून राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम पोस्टबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सने फेसबुकला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख उघड केली आहे, जे बाल न्याय कायद्याच्या तरतुदींच्या विरोधात आहे.


आयोगाने फेसबुकला पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून ती पोस्ट त्वरित काढून टाकावी. यासह, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला या संदर्भात केलेल्या कारवाईची माहिती 3 दिवसांच्या आत द्यावी.


याआधी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानेही ट्विटरला असेच पत्र पाठवले आहे. यानंतर ट्विटरने राहुल गांधींच्या अकाऊंटवरून केवळ प्रश्नातील ट्विट काढून टाकले नाही तर त्यासोबत राहुल गांधींचे अकाऊंट लॉकही केले.


Twitter Account : काँग्रेसविरोधात ट्विटरचा कारवाईचा सपाटा; पक्षाचे अधिकृत अकाऊंट बंद


राहुल गांधी यांचे खाते लॉक झाल्यानंतर, काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ ट्विट करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्या नेत्यांची खातीही लॉक झाली. सध्या काँग्रेस या प्रकरणाबाबत सरकार आणि ट्विटरवर हल्ला करत आहे. राहुल गांधींसह इतर नेत्यांचे ट्विट त्यांच्या धोरणाच्या विरोधात असल्याने कारवाई केल्याचे ट्विटरने सांगितले आहे.


विशेष म्हणजे, दिल्लीतील कथित बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर राहुल गांधींवर पीडितेची ट्विटद्वारे ओळख सार्वजनिक केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची स्वत: दखल घेत पोलीस आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.


काँग्रेस विरोधात ट्विटरची कारवाई
राहुल गांधींचे ट्विटर अकाऊंट निलंबित केल्यानंतर ट्विटरने अनेक काँग्रेस नेत्यांची खात्यांवरही कारवाई केली आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हॅन्डल निलंबित केलं आहे. तसेच मुंबई काँग्रेसचे ट्विटर अकाऊंट आणि देशातील तसेच राज्यातील महत्वाच्या नेत्यांचे ट्विटर अकाऊंट निलंबित केलं आहे.


राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे अकाऊंट तात्पुरतं निलंबित केलं होतं. त्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासोबत आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, तेलंगणा काँग्रेस प्रभारी मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, हरीश रावत आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांचेही ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.