Sharad Pawar Will Meets rajnath singh : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं वृत्त आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शरद पवार दिल्लीत दाखल होणार आहेत. अडीच वाजता डिफेन्स कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसही दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांच्या दिल्लीवारीमुळे अनेक चर्चेला उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट होणार आहे का? सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या विविध घटनेवर दिल्लीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल का? यासारख्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल पटेल दिल्लीत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या दौऱ्यात ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भेटण्याची शक्यता आहे. डिफेन्स कमिटीच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत असल्याची माहिती मिळतीय. शरद पवार डिफेन्स कमिटीचे सदस्य आहेत. त्यामुळे या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीला गेले आहेत. या डिफेन्स कमिटीच्या बैठकीनंतर दिल्लीत शरद पवार राजनाथ सिंह यांची भेट घेणार असल्याचं समजतेय. या भेटीदरम्यान, विविध विषयावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे फडणवीस यांच्यानंतर पवारांच्या दिल्लीवारीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 


महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. राज्य सरकारविरोधात प्रत्येक गोष्टीवर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. एसटी संप असो अथवा अमरावती आंदोलन अथवा इतर घटना, या सर्व घडामोडी घडत असताना भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबधित बातम्या :
Devendra Fadnavis : चंद्रकांत पाटील यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीवारी, भाजपच्या गोटात नेमकं शिजतंय काय?