बारामती : जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण देश शहीदांच्या पाठीशी उभा आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, मात्र देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपयश आल्याचं समोर आलं असल्याची टीका शरद पवारांना केली.

लष्कराच्या जवानांवर झालेला हल्ला चिंतेची बाब आहे. ज्या मार्गावर हा दहशतवादी हल्ला झाला, तो परिसर तुलनात्मकरित्या सुरक्षित आहे. मात्र या मार्गावरुन सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जाणार आहे, याची माहिती दहशतवाद्यांना आधीच मिळाली असावी आणि ही चिंतेची बाब आहे. तसेच एवढा मोठा ताफा जात असताना सुरक्षेची किती खबरदारी घेतली होती, याबाबतही या घटनेमुळे शंका उपस्थित केली जात आहे.

पुलवामामधील हल्ला हा देशावरील हल्ला आहे. त्यामुळे यावर राजकारण करण्याची ही वेळ नाही. सध्या सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर नसताना मागील सरकारवर दहशतवादी हल्ल्यांवरुन सडकून टीका केली होती. दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी 56 इंच छाती हवी अशा शब्दात नरेंद्र मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती, याची आठवण शरद पवार यांनी करुन दिली.

नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेप्रमाणे आम्ही टीका करणार नाही. सध्याची स्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत शहीद आणि जखमी जवानांच्या कुटुंबियांच्या मागे उभे राहण्याची गरज असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं.

सीआरपीएचे 37 जवान शहीद

गुरुवारी 3 वाजून 37 मिनिटांनी हा हल्ला झाला होता. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘जैश’चा पुलवामा येथील दहशतवादी आदिल अहमद दार याने हा हल्ला घडवला. आदिल हा काकापोरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटकांनी भरलेल्या ज्या गाडीने जवानांच्या बसला धडक दिली, ती गाडी आदिल चालवत होता. आदिलच्या गाडीने जवानांच्या गाडीला धडक दिली. या धडकेमुळे मोठा स्फोट झाला.

VIDEO | देशाचं संरक्षण करण्यात 56 इंच छाती असलेल्या पंतप्रधानांना अपयश आलं- शरद पवार | बारामती | एबीपी माझा

संबधित बातम्याPulwama terror attack : हल्ल्याला फक्त पाकिस्तान जबाबदार नाही, फारुख अब्दुल्लांचं वादग्रस्त वक्तव्यPulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावंPulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संतापभ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहनजवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदीशहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारापुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद