यूएनमध्ये नवाज शरीफ यांचं भाषण होणार आहे. या भाषणात शरीफ ज्या मुद्द्यांवर बोलणार आहेत, त्यातील 8 मुद्दे लीक झाले आहेत. एबीपी न्यूजच्या सूत्रांच्या हाती शरीफ यांच्या भाषणातील मुद्दे लागले आहेत.
शरीफ यांच्या भाषणात काय असेल?
- भारतातील जम्मू-काश्मीरची स्थिती
- स्वातंत्र्याची मागणी
- काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं कथित उल्लंघन
- जम्मू-काश्मीरमध्ये पेलेट गनचा वापर
- कथित हेर कुलभूषण यादव
- संयुक्त राष्ट्राकडून कारवाईची मागणी
- पाकिस्तानमध्ये शांतता
- पाकिस्तानही दहशतवादापासून त्रस्त
एबीपी न्यूजला मिळालेली ही माहिती सूत्रांनी दिली असून, नवाज शरीफ शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्या भाषणातील मुद्दे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, पाकिस्तानातून रवाना होताना त्यांच्या भाषणात हे सर्व मुद्दे होते.
यूएनने याआधीच स्पष्ट केलं आहे की, काश्मीर प्रश्नावर तोपर्यंत हस्तक्षेप केला जाणार नाही, जोपर्यंत भारत काही सांगत नाही. कारण काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील मुद्दा आहे.