नवी दिल्ली : भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अटलजींचं नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या देशाच्या सेवेचं विकासामध्ये खूप मोठं योगदान आहे, असं ट्वीट पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

https://twitter.com/narendramodi/status/812834842530324481

अटल बिहारी वाजपेयींचं सामान्य कार्यकर्त्यांविषयीचं प्रेम दाखवणारा एक व्हिडिओ देखील पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे. अटलजींचा हा दिलदारपणा आम्ही सर्वांनी हृदयात जतन करुन ठेवला आहे, असं ट्वीट मोदींनी केलं आहे.

https://twitter.com/narendramodi/status/812836748644392960