ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : माजी वायूदल प्रमुख एसपी त्यागी यांना पटियाला कोर्टाकडून जामीन

------------------------------

नाशिकरोड कारागृहात पुन्हा 2 मोबाईल सापडले, मोबाइल वापरणाऱ्या कैद्याकडून अधिकाऱ्याला मारहाण, शनिवारची घटना

------------------------------

नाशिक : मालेगावातील संगमेश्वर भागात राहणाऱ्या 3 मुलांचा तलावात बुडून मृत्यू, रोकडोबा येथील मंदिर परिसरातील घटना

------------------------------



नागपुरच्या डोंगरवाडी परिसरात कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू


------------------------------

नवी मुंबई: नवीन पनवेलमधून 35 लाखांच्या नव्या नोटांसह 2 किलो सोन्याची बिस्किटे जप्त, सहा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

------------------------------

हेडलाईन्स :

शिवस्मारक भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पालिका निवडणुकीचं बिगुल, मुंबईसाठी 1 लाख 6 हजार कोटीच्या घोषणांचा पाऊस, रेल्वे, रस्ते आणि मेट्रो प्रकल्पांचं भूमिपूजन

--------------

शहरांप्रमाणे आता गावातही सुविधा देणार, पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात मोदींची घोषणा, पवारांच्या उपस्थितीत आघाडी सरकारला टोले

----------------

30 डिसेंबरनंतर काळे पैसेवाल्यांचं जगणं मुश्कील होणार, इमानदारीने काळा पैसा परत करण्याचा पंतप्रधान मोदींचा इशारा, घोटाळेबाज बँकवाल्यांवर कारवाईचे संकेत

------------------

भाजप नेत्यांच्या भाषणावेळी शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी, संतप्त मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन, तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी मोदींच्या नावाचा गजर

------------------

महाराष्ट्राचे गडकिल्ले पुरातत्व खात्याच्या तावडीतून मुक्त करा, उद्धव ठाकरेंची मागणी, तर कोस्टल रोडचा प्रकल्प पर्यावरण खात्याने रखडवल्याचं सूचक वक्तव्य

-----------------

वैद्यनाथ बँकेच्या गैरव्यवहारात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य, पद्मभूषण सन्मानित डॉक्टरांवर गुन्हा दाखल

------------------

खंडणीसाठी अपहरण केलेल्या मुलीची चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या, मुंबईतल्या कामाठीपुरात मृतदेह आढळला, दोघे अटकेत

------------------

ज्येष्ठ व्यंगचित्रकार वसंत सरवटे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, उद्या मुंबईत अंत्यसंस्कार