नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi Instagram Video) यांनी गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ शेअर करत जंतर मंतरवर त्यांना शिवीगाळ केली गेल्याचा उल्लेख केला. मात्र, मुलांना माफ करायचंय, असं देखील मोदी म्हणाले. देश पुढं जातोय, मुलांनी पुढं जावं यासाठी सोबत येऊन काम करु, असं मोदी म्हणाले. 

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

नरेंद्र मोदी म्हणाले की, हाय फ्रेंडस, माझ्या मनाला वाटतं फक्त तुमच्याशी बोलू, जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं आहे. काही खोडकर मुलांनी शिवीगाळ केली. कोणत्याही समाजाला शोभणार नाही, अशा शब्दांचा वापर केला गेला. मला शिव्या दिल्या, माझ्या स्वर्गीय आईला देखील शिव्या दिल्या. मात्र, मला आज बोलायचं आहे, लहान असताना चुका होतात, लहानपणात सुधारण्याची संधी असते,हेच लहानपणाचं लक्षण आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

मी समाजात असलेला आक्रोश चांगल्या समजून घेऊ शकतो, हा सांस्कृतिक धक्का आहे. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशा बोलू शकतात हा प्रश्न आहे. मात्र, वेळ आहे, या मुलांची गळाभेट घेऊन त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे. या भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, असं देखील मोदींनी म्हटलं.

Continues below advertisement

नरेंद्र मोदी पुढं म्हणाले,  मुलांना शिक्षा देणे, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं,समाजात त्यांना त्रास देणं, यातून आपण परिस्थिती बदलू शकत नाही. मला त्यांना माफ करायचं आहे. समाजानं माझी ही गोष्ट स्वीकारावी. कारण माझ्या मनात  हीच भावना आहे. कारण, कधी कधी दातांमध्ये जीभ चावली जाते, रक्त येतं, त्यामुळं आपण दात तोडत नाही, कारण दात आपलेच, जीभ आपलीच असते. 

मुलं आपली आहेत, त्यांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, असं मोदींनी म्हटलं. भरकटलेल्यांना मार्ग दाखवणं अवघड काम असतं.यामुळं या मुलांना आवाहन करतोय, आपण देशासाठी सोबत पुढं जाऊ,काही नवं शिकुया, चुकांमधून शिकुया, आपल्या स्वप्नांना घेऊन पुढं जाऊया, देश खूप पुढं जात आहे, पुढे जाणार आहे. तुम्ही देखील पुढं जावं,हेच माझं स्वप्न आहे मी तुमच्यासाठी जगतोय, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करतोय, मुलांनो चुकांमधून शिका आणि पुढे जाऊया, असं मोदींनी व्हिडिओत म्हटलं 

मोदींचा व्हिडिओ :