नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवले आहे. 30 मे रोजी नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीनंतर मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यांसाठी सज्ज झाले आहेत. शपथविधी होण्यापूर्वी मोदींचे परदेश दौऱ्यांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. सर्वप्रथम नरेंद्र मोदी शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे होणाऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. ही बैठक 14-15 जूनदरम्यान होणार आहे. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित राहणार आहेत. 28-29 जून दरम्यान नरेंद्र मोदी जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी20 शिखर परिषदेला हजर राहणार आहेत. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह जगभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. 2014 साली पंतप्रधान मोदींनी भुतानपासून परदेश दोऱ्यांना सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे मोदी यावर्षीदेखील 'पडोसी पहले' या तत्वानुसार यंदादेखील भारताशेजारच्या देशाला सर्वप्रथम भेट देतील, अशी चर्चा आहे. Narendra Modi Speech | भारतीय जनतेनं या फकिराची झोळी भरली, लोकसभा निकालानंतर नरेंद्र मोदींचं भाषण | एबीपी माझा जी20 परिषदेनंर मोदी चीनच्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. ही अनौपचारिक भेट असेल. जूलै किंवा ऑगस्टमध्ये या भेटीचे आयोजन केले जाईल. फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्यूल मँक्रो यांनी मोदींना फ्रान्समध्ये होणाऱ्या शिखर संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. या संमेलनासाठी ऑगस्टमध्ये मोदी फ्रान्सला जातील. फ्रान्सनंतर मोदी त्यांचा मोर्चा रशियाकडे वळवतील. रशियामध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॅदीमिर पुतीन यांनी मोदींना वलादिवोस्टकमध्ये होणाऱ्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये मोदी रशियाला जातील. त्यानंतर मोदी बँकॉकमध्ये होणाऱ्या ईस्ट-एशिया समिट आणि ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार आहेत. ईस्ट-एशिया समिट 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर ब्रिक्स परिषद 11 ते 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे.