नरेंद्र मोदींनी म्हटले आहे की, "आज यांना (सनी देओल) भेटून मला खूप आनंद झाला आहे. गुरुदासपूरमध्ये यांना विजय मिळावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. भारत समृद्ध होईल, यावर आम्हा दोघांचे एकमत झाले आहे." त्यासोबतच मोदींनी लिहिलं आहे, "हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा."
सनी देओलने 22 एप्रिल रोजी भाजपात प्रवेश केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सनीला भाजपने गुरुदासपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. या मतदार संघातून सनीचा मुकाबला काँग्रेस उमेदवार सुनील जाखड यांच्यासोबत होणार आहे.
सनी देओलचा चित्रपट 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटात सनीच्या तोंडी एक डायलॉग आहे. ज्यामध्ये सनी देओल पाकिस्तानमध्ये जाऊन त्याच्या सासऱ्याला (अमरिश पुरी) म्हणतो, "हमारा हिंदुस्तान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा." सनीचा हा डायलॉग आजही प्रत्येक भारतीयाच्या लक्षात आहे. त्यामुळे आज सनीला भेटल्यावर पंतप्रधान मोदींनीही या डायलॉगची आठवण करुन दिली.