Narendra Modi in Dwarka : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील प्राचीन द्वारकेचे (Dwarka) दर्शन घेण्यासाठी खोल समुद्रात गेलेले पाहायला मिळाले. मोदींनी खोल समुद्रात पाण्याखाली जात द्वारकेजवळ जात प्रार्थना केली. पीएम मोदींनी द्वारकेचे दर्शन घेतल्यानंतर अनुभवही शेअर केले आहेत. "आजच्या अनुभवाने भारताच्या अध्यात्मिक आणि ऐतिहासिक बाबींच्या मुळाशी जाता आले",अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. यावेळी मोदींनी द्वारका नगरीला श्रद्धांजलीही अर्पण केली. श्रीकृष्णा आपणा सर्वांना आशीर्वाद देईल, असेही पीएम मोदींनी म्हटले आहे. 


दर्शन घेतल्यानंतर काय म्हणाले पीएम मोदी? 


पीएम मोदी म्हणाले, "श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या द्वारकाधामला मी नमन करतो. देवभूमी असलेल्या द्वारकेत श्रीकृष्णा द्वारकाधीश म्हणून विराजमान झाले होते. इथे जे काही होते ते द्वारकाधीशाच्या इच्छेने होते. मी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारेकेचे दर्शन घेतले. पुरातत्व विभागाने प्राचीन द्वारकेबाबत बरेच काही लिहिले आहे. विश्वकर्माने स्वत: या द्वारकानगरीची निर्मिती केली होती,असे म्हटले जाते. आज मी भावनिक झालो आहे. अनेक दशकांपासून जे स्वप्न पाहिले. ते आज पूर्ण झाले. तुम्हाला कल्पना असेल की मला आज किती आनंद झाला असेल."






पीएम मोदींच्या हस्ते झाले सुदर्शन सेतूचे उद्घाटन 


यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी बेट द्वारकास्थित मंदिरात गेले होते. सकाळी दर्शन घेतल्यानंतर त्यांनी सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. हा देशतील सर्वांत मोठा केबल ब्रीज आहे. 2017 मध्ये या पूलाचे काम सुरु झाले होते. त्याचे उद्घाटन आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले आहे. हा पूल बनवण्यासाठी 900 कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आले आहेत. 


शंकराचार्यांचेही घेतले दर्शन 


द्वारका येथे पीएम मोदींनी द्वारकाधीश मंदिराचाही दौरा केला. इथेच त्यांनी पूजा केली आणि द्वारकाधीशाचे दर्शन घेतले. त्यांनी द्वारका या पीठाच्या शंकराचार्यांचेही दर्शन घेतले आणि त्यांना पुष्पहार अर्पण केला. शंकराचार्य़ांनी पीएम मोदींना वस्त्र आणि रुद्राक्षांची माळ भेट दिली आहे. यानंतर पीएम मोदी बोटीतून समुद्रात गेले. पुढे त्यांनी खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारकेचे दर्शन घेतले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Farmer Protest : शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, आणखी 1 शेतकऱ्याचा मृत्यू, 3 पोलिसांचाही मृत्यू, अनेक जण जखमी