मालदीवच्या संसदेचे स्पीकर आणि माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी मंगळवारी जाहीर केले होते की, मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मालदीच्या संसदेला संबोधित करण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या शपथविधीला हजेरी लावली होती. त्यानंतर आता मोदी पुन्हा एकदा मालदीव दौऱ्यावर निघाले आहेत. याआधी 2011 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीदेखील मालदीव दौरा केला होता.
2014 साली पंतप्रधान मोदींनी भुतानपासून परदेश दोऱ्यांना सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे मोदी यंदादेखील 'पडोसी पहले' या तत्वानुसार भारताशेजारच्या देशाला सर्वप्रथम भेटी देत आहेत.
अबब! मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 'इतका' खर्च
दरम्यान, नरेंद्र मोदी शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे होणाऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. ही बैठक 14-15 जूनदरम्यान होणार आहे. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शपथविधीआधीच नरेंद्र मोदींचं परदेश दौऱ्यांचं वेळापत्रक तयार
28-29 जून दरम्यान नरेंद्र मोदी जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी20 शिखर परिषदेला हजर राहणार आहेत. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह जगभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.