ज्यांच्या भरोशावर ट्वीट, त्यांनीच राहुल गांधींना तोंडघशी पाडलं
एबीपी माझा वेब टीम | 08 Nov 2017 08:58 PM (IST)
वर्षभरानंतर आपण आनंदी असल्याचा दावा नंदलाल यांनी केला. लागलीच अमित शाह यांनी राहुल गांधींना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं.
नवी दिल्ली : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणारे 80 वर्षाचे निवृत्त सैनिक नंदलाल यांची सकाळपासूनच देशभर चर्चा सुरु आहे. नंदलाल यांच्या फोटोमुळे काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात ट्विटरयुद्ध सुरू झालं. मात्र हे ट्वीटच राहुल गांधींवर उलटलं आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राहुल गांधी यांनी नंदलाल यांचा फोटो शेअर करुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागलं. 8 नोव्हेंबर... नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगाबाहेर उभ्या असलेल्या नंदलाल यांचा रडणारा चेहरा ट्वीट करताना राहुल गांधी म्हणतात... "एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना" https://twitter.com/OfficeOfRG/status/928090550636384256