नवी दिल्ली: केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री नजमा हेपतुल्ला आणि राज्यमंत्री जी. एम. सिद्धेश्वरा यांनी राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी हेपतुल्ला आणि सिद्धेश्वरा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

 

हेपतुल्ला आणि सिद्धेश्वरा यांच्याकडची खाती मुख्तार अब्बास नक्वी आणि बाबुल सुप्रियो यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचं समजतं आहे. वयाची पंच्चाहतरी पार केलेल्या मंत्र्यांना मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात येणार असल्याचे संकेत आधीच देण्यात आले होते.

 

दुसरीकडे कर्नाटकमधील जीएम सिद्धेश्वरा यांनीही आपल्या केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. एक आठवड्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी पाच मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्याचवेळी सिद्धेश्वरा यांचा राजीनामा घेतला जाणार होता. मात्र, काही कारणास्तव तेव्हा त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. अखेर नजमा हेपतुल्ला यांच्यासोबतच आज सिद्धेश्वरा यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे.