जम्मू-काश्मीरमध्ये काल वेगवेगळ्या ठिकाणी संध्याकाळी साडे सहा ते रात्री साडे अकरापर्यंत दहशतवाद्यांनी सीआरपीएफ, जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराच्या सहा ठिकाणांना निशाणा बनवलं.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल, पडगामपोरा, पहलगाममधील सरनाल, सोपोरमधील पाजलपुरा आणि अनंतनागमधील सुरक्षरक्षक आणि लष्कराच्या ठिकाणांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले. या घटनेनंतर काश्मीर खोऱ्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आता काश्मीर खोऱ्यातील काना-कोपऱ्यात शोधमोहीम सुरु आहे.
कुठे हल्ला?
- पहिला हल्ला – पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सीआरपीएप कॅम्पवर ग्रेनेड फेकले. यात जवान आणि एक अधिकारी जखमी झाले.
- दुसरा हल्ला – पुलवामा जिल्ह्यात पडगामपोरामध्ये सीआरपीएफ कॅम्पवर ग्रेनेड हल्ला. यात कोणतंही नुकसान झालं नाही.
- तिसरा हल्ला – पुलवामामध्येच रात्री 9 वाजता पोलिस ठाण्यावर ग्रेनेड फेकले. यादरम्यान जवळपास 15 मिनिटांपर्यंत पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु होता.
- चौथा हल्ला – पहलगाममधील सरनालमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला.
- पाचवा हल्ला – सोपोरमधील पाजलपुरामध्ये लष्कराच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला.
- सहावा हल्ला – त्रालमध्ये लष्कराच्या 42 राष्ट्रीय रायफल्स कॅम्पवर ग्रेनेड हल्ला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु झाला.