लखनऊ : मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेला समाजवादी पक्षातील गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाही. कारण सत्तेसाठी नाती-गोती वेशीला टांगणाऱ्या यादव कुटुंबाने आता पक्षाच्या चिन्हं असलेल्या सायकलसाठी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. समाजवादी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद मिळवल्यानंतर अखिलेश यादव यांचं समाजवादी पक्षावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित झालं आहे. पण असं असलं, तरी वडील मुलायम सिंह हे पक्षाचं चिन्हं आपल्याकडे राहावं यासाठी निवडणूक आयोगात पोहोचले आहेत. मुलायम सिंह आणि त्यांचे निकटवर्ती शिवपाल हे दोघेही आज दिल्लीत निवडणूक आयोगाकडे या चिन्हाच्या मागणीसाठी जाणार आहेत

उत्तर प्रदेशात 'यादवी', अखिलेश यांच्याकडे सपाची सर्व सूत्र

समाजवादी पक्षातल्या 200 हून अधिक आमदारांचा स्पष्ट पाठिंबा मिळाल्याने अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी भीती वडील मुलायम सिंह यांना असल्यानेच हा सगळा खटाटोप सुरु आहे. त्यामुळे आता सायकलवर कोण स्वार होणार मुलायम सिंह की त्यांचा मुलगा अखिलेश यादव, हा प्रश्न आहे. सपाला सत्तेपर्यंत पोहोचवण्यासत सायकलची महत्त्वाची भूमिका उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची सत्ता स्थापन करण्यात सायकल या चिन्हाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकेकाळी सायकलवर स्वार होऊन मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशच्या सत्तेच्या शिखरावर पोहोचले. तर अखिलेश यादव यांनाही सायकलनेच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं. पण आता समाजवादी पार्टीचं चिन्हं सायकलसाठी वडील आणि मुलामध्ये लढाई सुरु झाली आहे. सायकलची स्वारी कोण करणार? समाजवादी पार्टीचे दोन भाग झाल्यानंतर आता सायकलची स्वारी कोण करणार यावर वाद सुरु झाला आहे. पार्टीत फूट पडल्यानंतर सायकलवर कोणाचा ताबा असेल, हा वाद आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता. रविवारी झालेलं अधिवेशन अवैध आणि घटनाविरोधी असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं.

समाजवादी पक्षातलं भांडण आता निवडणूक आयोगाच्या दारात

  सपाचं 5 जानेवारीचं अधिवेशन स्थगित दरम्यान, मुलायम सिंह यांनी पाच जानेवारी होणारं अधिवेशन स्थगित केलं आहे. शिवपाल यादव यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे. "नेताजी यांच्या आदेशानुसार समाजवादी पार्टीचं 5 जानेवारी रोजी होणारं अधिवेशन स्थगित केलं आहे. सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या निवडणूक क्षेत्रात तयारी करा आणि विजयासाठी कठोर मेहनत करा," असं शिवपाल यादव यांनी ट्विटरवर लिहिलं आहे.

अखिलेश आणि रामपाल यादवांचं निलंबन रद्द

  अखिलेश यांच्याकडे सपाची सर्व सूत्र उत्तर प्रदेशच्या राजकारणात ‘यादवी’ माजली आहे. लखनऊमध्ये रामगोपाल यादव यांनी समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं अधिवेशन बोलावलं आणि त्यात अखिलेश यादव यांची एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या अधिवेशनाला मुलायम सिंह अनुपस्थित होते. त्यामुळे अखिलेश गटाचं अधिवेशन असं या अधिवेशनाला रुप आलं होतं.

मुख्यमंत्री अखिलेश यादवांची समाजवादी पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी

मुलायम सिंह मार्गदर्शक, तर शिवपालना हटवलं

अधिवेशनात अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आलं, त्याचबरोबर शिवपाल यांना उत्तर प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. इतकंच नव्हे, तर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांची मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली. याआधी मुलायम सिंह हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अमर सिंह यांना पक्षाबाहेरचा रस्ता समाजवादी पक्षाचे सरचिटणी अमर सिंह यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यादव कुटुंबातील वादाला अमर सिंह कारणीभूत असल्याचा अखिलेश समर्थकांचा आरोप आहे. त्यामुळे अखिलेश समर्थकांचा अमर सिंह यांच्याविरोधात संताप आहे. अखेर आजच्या लखनऊमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी अमर सिंह यांना पक्षातूनच बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

सपामध्ये उभी फूट, अखिलेश यादवांकडून 235 उमेदवारांची यादी जाहीर

रामगोपाल यादव यांचं पुन्हा निलंबन एकीकडे अखिलेश यादव यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं आहे. तर निलंबन मागे घेतलेल्या रामगोपाल यादव यांना पुन्हा 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. नेमका वाद काय? निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता. त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे. त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते. पुन्हा वाद उफाळला शिवपाल यादव हे मुलायमसिंहांचे लहान बंधू. तेच त्यांच्या जास्त जवळचे आहेत. त्यामुळेच शिवपाल यांनी मंत्रिमंडळात परतल्यानंतर अखिलेश समर्थकांवर धडाधड वार करण्यास सुरुवात केली. अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला. कोण कुणाच्या बाजूने?
मुलायम सिंह अखिलेश यादव
शिवपाल यादव (सख्खाभाऊ) पत्नी डिंपल यादव
मुलायम सिंहांची पत्नी साधना रामगोपाल यादव (मुलायम सिंहांचे चुलतभाऊ)
मुलगा प्रतिक यादव अक्षय यादव (रामगोपाल यांचे पुत्र)
शिवपाल यांचा मुलगा आदित्य