Mulayam Singh Yadav News : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. अशातच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. 


समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी मेदांता रुग्णालयात निधन झालं. मुलायम यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुलायम सिंहांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्रीपद भूषवलं असून 1977 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशमधील जनता पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. 


यासोबतच ते लोकदल, लोकदल (बी) आणि जनता दलाच्या यूपी युनिटचे प्रदेशाध्यक्षही होते. 1982 मध्ये मुलायम सिंह यादव विधान परिषदेचे सदस्य बनले. त्यानंतर 1987 पर्यंत ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राहिले. 1989 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि 1991 पर्यंत त्यांनी हे पद भूषवलं. इटावा जिल्ह्यातील सैफई येथे 22 नोव्हेंबर 1939 रोजी जन्मलेल्या मुलायम सिंह यादव यांनी राज्यशास्त्रात एमएपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं .


मुलायम सिंह यादव यांचा राजकीय प्रवास  



  • समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे संरक्षक होते.

  • त्यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं.  

  • देशाचे संरक्षण मंत्री राहिले होते.

  • उत्तर प्रदेश विधानसभेतून 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 

  • लोकसभेवर सात वेळा निवडून आले होते.

  • मुलायम सिंह एकदा विधान परिषदेवरही निवडून गेले होते. 

  • 1967 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

  • 1977 मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मंत्री झाले.

  • लोकदल, लोकदल (ब) आणि जनता दलाच्या यूपी युनिटचे प्रदेशाध्यक्ष होते. 

  • 1982 मध्ये विधान परिषदेचे सदस्य झाले.

  • 1982 ते 1985 पर्यंत ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते.

  • 1985 ते 1987 पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 

  • 1989 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले, 1991 पर्यंत मुख्यमंत्री राहिले.

  • 4 ऑक्टोबर 1992 रोजी त्यांनी समाजवादी पार्टी पक्षाची स्थापना केली.

  • समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष झाले.

  • 1993 ते 1995 या काळात दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.

  • 1996 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.

  • 1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते.

  • ऑगस्ट 2003 ते मे 2007 पर्यंत ते तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

  • 14 मे 2007 ते 15 मे 2009 या काळात ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.

  • मुलायम सिंह यादव 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेवर निवडून गेले. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mulayam Singh Yadav Demise: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास