मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरलं आहे. पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये भारतातच हा विवाहसोहळा होईल.


ईशा अंबानी आणि आनंद पिरामल अनेक वर्षांपासून मित्र आहेत. शिवाय अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे गेल्या चार दशकांपासून मैत्रीचे संबंध आहेत. हेच मैत्रीचे संबंध आता नात्यांमध्ये बदलणार आहेत.

कोण आहेत आनंद पीरामल?

आनंद पिरामल देशातील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या पिरामल रिअल्टीचे कार्यकारी संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवत ‘पिरामल स्वास्थ्य’ची सुरुवात केली होती. ‘पिरामल स्वास्थ्य’कडून आज एकाच दिवसात तब्बल 40 हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार केला जातो. आनंद पिरामल इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्षही होते.

आनंज पिरामल यांनी पेंसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे. तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली.

सर्वात श्रीमंत उद्योगपतीची एकुलती एक मुलगी ईशा

26 वर्षीय ईशा अंबानी रिलायन्स जिओ आणि रिटेल बोर्डाची सदस्य आहे. तिने प्रसिद्ध येल विद्यापीठातून मानसशास्त्र आणि दक्षिण आशिया अभ्यासात ग्रॅज्युएशन केलं आहे. ईशा याच वर्षी स्टॅण्डफोर्डच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर पूर्ण करणार आहे.

लग्नाचा प्रस्ताव कसा आला?

अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांचे मैत्रीचे संबंध होते. शिवाय ईशा आणि आनंद यांचीही मैत्री होती. या मैत्रीचं रुपांतर नात्यामध्ये करायचं होतं. यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील एका मंदिराची निवड करण्यात आली.

लग्नाचा प्रस्ताव पिरामल कुटुंबीयांकडून आला. आनंद पिरामल यांनी महाबळेश्वरच्या मंदिरात ईशाला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि हा प्रस्ताव दोन्हीही कुटुंबीयांनी मान्य केला. यावेळी अंबानी आणि पिरामल कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. लग्नाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी सोबत जेवण केलं.

संबंधित बातम्या :

अंबानींच्या घरी लग्नाची धामधूम, अँटिलियात ग्रॅण्ड पार्टी


मुकेश अंबानींच्या मुलाचा गोव्यात प्री एंगेजमेंट सोहळा