नवी दिल्ली : धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप खासदार विकास महात्मे यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. आज राज्यसभेत खासदार विकास महात्मे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यात धनगरचा धनगड झाल्यामुळे कसा धोका झाला हे सांगत समाजामध्ये फसवल्याची भावना असल्याचं म्हणत आपल्याच सरकारला सवाल विचारलेत.
धनगर आरक्षणाबाबत आज भाजप खासदार विकास महात्मे यांनी राज्यसभेत लक्षवेधी उपस्थित केली. र चा ड झाल्यामुळे कसा धोका झाला आहे हे सुद्धी सांगितलं. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात धनगर समाजाला आश्वासन दिलं पण ते पूर्ण नाही झालं. त्यामुळे समाजामधे फसवल्याची भावना आहे, असं म्हणत त्यांनी आपल्याच सरकारकडे बोट दाखवलं आहे.
सभागृहाबाहेर सरकारवर अनेक आरोप होत असतात, पण संसदेत एखाद्या खासदाराने आपल्याच पक्षानं वचन पूर्ण नाही केलं असं म्हटल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.