नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणी अपशब्द काढले, तर त्याला पहिल्यांदा महाराष्ट्रातून हद्दपार केलं पाहिजे, हद्दपार जर त्यांनी केलं नाही तर आम्ही करु, अशा तिखट शब्दांत खासदार युवराज संभाजीराजे यांनी अहमदनगरच्या छिंदम प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. राजधानी दिल्लीत पहिल्यांदाच जी भव्य शिवजयंती साजरी होणार आहे, त्याच्या तयारीनिमित्त ते एबीपी माझाशी बोलते होते.
महाराष्ट्रासह दिल्लीत शिवजयंतीचा उत्साह असताना अशा पद्धतीचं वक्तव्य सत्ताधारी पक्षाचे उपमहापौर करतात, तुम्ही आता भाजपचे सहयोगी खासदार आहात, त्यावर तुमची प्रतिक्रिया आहे असा प्रश्न विचारला असता, संभाजीराजेंनी माझ्यासाठी छत्रपती शिवराय हा विषय पक्षाच्या पलीकडचा आहे असं सांगत वरील प्रतिक्रिया दिलीय.
असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्यानी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीनं खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदमला भाजपनं उपहामौरपदावरुन निलंबित केलं आहे. त्याची भाजपमधूनही हकालपट्टी करण्यात आल्याचंही सांगितलं जातंय. संभाजीराजे हे राज्यसभेवर राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित खासदार आहेत. राज्यसभेत भाजपचे सहयोगी सदस्यत्व त्यांनी स्वीकारलंय.
काय आहे प्रकरण?
अहमदनगरचे निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमची कथित क्लिप समोर आली आहे. एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना छिंदमने फोन केला, यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली.
छिंदमवर भाजपची कारवाई
“शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.” अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
संबंधित बातम्या :
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत
नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Feb 2018 04:25 PM (IST)
असल्या माणसांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्यानी आता जरी माफी मागितली असली तरी नुसत्या माफीनं खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -