MP Plane Crash : मध्य प्रदेशातील मोरेनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने (Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crashed near Morena) कोसळली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले, जेथे सराव सुरू होता. या घटनेबाबत संरक्षणमंत्र्यांनी हवाई दल प्रमुखांशी चर्चा केली आहे.


माहिती देताना मुरैनाचे जिल्हाधिकारी म्हणाले की, जेट विमान पहाटे साडेपाच वाजता कोसळले. दोन्ही पायलट सुखरूप बाहेर पडले. या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की आणखी काही कारणामुळे अपघात झाला (Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crashed near Morena) याची चौकशी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातादरम्यान सुखोई 30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज 2000 मध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे तर हवाई दलाचे हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या ठिकाणी पोहोचले आहे.


राजस्थामध्ये विमान दुर्घटना


दुसरीकडे, प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी चार्टर्ड विमान कोसळले. जिल्हाधिकारी अशोक रंजन यांनी दुजोरा दिला आहे. पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही. भरतपूरच्या उचैन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान हवाई दलाचे आहे की लष्कराचे हे अद्याप निश्चित झालेले नाही. दुसरीकडे भरतपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या हे लहान विमान असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून स्पष्टता नाही. त्याचा आकाशातच स्फोट झाला होता. कोणाचा मृत्यू झाला आहे की नाही याची संपूर्ण चौकशी सुरू आहे.






इतर महत्वाच्या बातम्या