Rewa News : असं म्हणतात की लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. खरंतर, वयाच्या 14 महिन्यांत लहान मुले नातेवाईकांना नीट ओळखत पण नाहीत. त्या वयात मध्य प्रदेशातील रीवा येथील एका मुलाने 26 देशांचे झेंडे ओळखून जागतिक विक्रमात (World Record) आपले नाव नोंदवले आहे. यशस्वी नावाच्या या मुलाच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, तो आता सुमारे 194 देशांचे झेंडे आणि राजधानीची माहिती देऊ शकतो. रीवा जिल्ह्यातील राहणाऱ्या संजय मिश्रा यांच्या घरी यशस्वीचा जन्म झाला. तो चार-पाच महिन्यांचा असल्यापासून त्याची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण होती.


यशस्वीचे वडील संजय मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 6 महिन्यांत, त्याने पाहिलेले चित्र लगेच ओळखायचा. जसजसे वय वाढत गेले, तसतशी त्याची प्रतिभा चमकत राहिली. 25 फेब्रुवारी 2022 रोजी, लंडनच्या एका संस्थेने यशस्वीची ऑनलाइन चाचणी घेतली. तेव्हा 26 देशांचे झेंडे ओळखण्यात तो यशस्वी झाली. यानंतर त्याचे नाव जागतिक विक्रमात नोंदवले गेले. यशस्वी आता 15 महिन्यांचा झाला असून त्याची स्मरणशक्ती आणखी तीक्ष्ण झाल्याचे पालकांचे म्हणणं आहे. त्याला अनेक देशांच्या राजधानीचीही ओळख आहे. 


गुगल बॉय आणि सर्च इंजिन या नावाने प्रसिद्ध :
 
यशस्वीचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. रीवा आणि परिसरातील लोक त्याला 'सर्च इंजिन' (search engine)  आणि 'गुगल बॉय' (Google Boy) म्हणून ओळखत आहेत. 15 महिन्यांच्या लहान वयात, जबरदस्त स्मरणशक्तीने यशस्वीला इतर मुलांपासून पूर्णपणे वेगळे केले. यशस्वीकडून पालकांनाही मोठ्या आशा आहेत. यशस्वीची स्मरणशक्ती विलक्षण असल्याचे पालक सांगतात. 
 
तीन मिनिटांत 26 देशांचे झेंडे ओळखले 
 
यशस्वीने अवघ्या तीन मिनिटांत 26 देशांचे झेंडे ओळखले. एखाद्या देशाचे नाव उच्चारले की लगेच यशस्वी त्या देशाच्या ध्वजावर बोट ठेवतो. ऑनलाइन चाचणी दरम्यान यशस्वीने एकही चुकीचे उत्तर दिले नाही. त्याच्या अद्भुत क्षमतेमुळे लोक खूप प्रभावित होत आहेत.


महत्वाच्या बातम्या :