दिल्लीत सध्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची चर्चा सुरु आहे. त्यात ‘खासदार गायकवाड’ हे पंतप्रधान मोदींना भेटले, असं कळल्यावर सर्वांचे कान टवकारले. मात्र, ते खासदार रवींद्र गायकवाड नसून, भाजपचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड होते.
लातूरमधील विविध योजनांसाठी केंद्राने मदत केल्याने आभार मानण्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी खासदार सुनील गायकवाड यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
सुनील गायकवाडांनी पंतप्रधानांकडे कोणत्या मागण्या केल्या :
- लातूरला आकाशवाणीकेद्र देण्यात यावे
- लातूर शहराकरता उजणी धरणातून कायमस्वरुपी पाणी पुरवठा पाईपलाईन मंजूर करावी
- लातूर गुलबर्गा रेल्वेचा मंजूर झालेला मार्ग निंलगा व कासारशिरसीमार्गे करण्यात यावा
- लातूर शहराचा स्मार्ट सिटी या योजनेमध्ये समावेश करावा
- लातूरमधील पोस्ट आफिसला विभागीय कार्यालयाचा दर्जा देण्यात यावा
- लातूर येथे पासपोर्ट ऑफिस करण्यात यावे
- औंरगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला केद्रींय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा