Motivational Story : सायकलची दुरुस्ती करणाऱ्याने एका व्यक्तीने पॅरामोटर ग्लायडर (Parameter Glider) बनवत उंच झेप घेतली आहे. तीन वर्षांच्या मेहनतीच्या जोरावर आणि अडीच हजाराच्या मोटरसायकल इंजिनच्या मदतीने त्याने 'पॅरामोटर ग्लायडर' बनवलं आहे. 


सायकल दुरुस्ती करणाऱ्या पंजाबच्या हरप्रीत सिंहला (Harpreet Singh) लहानपणापासूनच पायलट (Pilot) होण्याची इच्छा होती. पण त्याला लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. वडिलांच्या निधनाने घराची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्याने हार मानली नाही. आसाममधील सैन्यदलात तो भरती झाला आणि तेथील ट्रेनिंग पूर्ण करुन त्याने पॅरामोटर ग्लायडर बनवलं आहे. 


हरप्रीतच्या संघर्षाची कहाणी जाणून घ्या...


'अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है', अगदी याचप्रमाणे हरप्रीतचं स्वप्न साकार झालं आहे. पंजाबच्या फरीदकोटामधील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या हरप्रीतने एक स्वप्न पाहिलं आणि अर्थात हे स्वप्न साकार करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. 


हरप्रीतचा जन्म गरीब कुटुंबात झाला असला आणि वडिलांचं निधन झालं असलं तरी त्याने मोठं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. या मेहनतीच्या जोरावर त्याने सायरलची दुरुस्ती करता करता पॅरामोटर ग्लायडर बनवलं आहे. आता त्याला इंडियन फ्लाइंग फोर्स पॉण्डिचेरीमध्ये नोकरी मिळाली आहे. या पॅरोमोटर ग्लायडरच्या माध्यमातून तो लोकांना हवाई सफर घडवत आहे. 


हरप्रीतचं आता पुढचं स्वप्न दोन व्यक्तींसाठी 'पॅरामोटर ग्लायडर' बनवण्याचं आहे. तसेच या पॅरामोटर ग्लायडर सफरीची किंमत खूपच कमी असणार आहे. गरिबांना हवाई सफर घडावी यासाठी त्याने खास हे पॅरामोटर ग्लायडर बनवलं आहे. 


हरप्रीतने आता गगनभरारी घेतली असली तरी आजही त्याचे पाय जमिनीवरचं आहेत. आता जेव्हा तो पंजाबमधील त्याच्या घरी येतो तेव्हा श्रीमंताच्या मैफिलीत जाण्यापेक्षा गरीब मुलांना पॅरामोटर ग्लायडरची माहिती द्यायला तो पसंती दर्शवतो. मुलांना त्याचा प्रेरणादायी प्रवास सांगतो तसेच नेहमी प्रयोग करत राहण्याचा सल्ला देतो. 


पॅरोमोटर ग्लायडरबद्दल हरप्रीत म्हणाला,"पॅरोमोटर ग्लायडर मी माझ्या खर्चाने बनवलं आहे. पॅरोमोटर ग्लायडर बनवण्याआधी मी सायरल दुरुस्ती करण्याचे काम करत असे. खरंतर लहानपणापासूनच वैमानिक होण्याची माझी इच्छा होती. आता सायरल दुरुस्तीचे काम करता करता मी पॅरोमोटर ग्लायडर बनवलं आहे. हे पॅरोमोटर ग्लायडर बनवण्यासाठी मला तीन वर्ष लागली असून अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत".


हरप्रीत पुढे म्हणाला,"सायकलचं हॅंडल, लाकडाचे पंख आणि मोटरसायकलच्या इंजिनाचा वापर करत मी पॅरोमोटर ग्लायडर बनवलं आहे. आता टू सीटर पॅरोमोटर ग्लायडर बनवण्याचा माझा पुढचा प्रयत्न असणार आहे. माझ्या शहरातील लोकांनी माझ्याच शहरात पॅरोमोटर ग्लायडरमध्ये बसून सफर करावी अशी माझी इच्छा आहे. जर हे पॅरोमोटर ग्लाडडर बनवण्यात सरकारने मला मदत केली तर मी आणख्या चांगल्या सुविधा असलेलं प्रोडक्ट बनवू शकतो".  


संबंधित बातम्या


48 दिवसआधीच नवज्योत सिंह सिद्धू येणार तुरुंगाबाहेर, काय आहे कारण?