नवी दिल्ली : दिल्लीजवळी ग्रेटर नोएडामध्ये 15 वर्षाच्या मुलानं आपल्या आईचा आणि बहिणीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी या आरोपी मुलाला वारासणीतून अटक केली आहे. दरम्यान, मुलानं आपणच दोघींचा खून केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.


आई आणि बहिणीचा खून केल्यानंतर हा मुलगा वाराणसीच्या दिशेने निघून गेला होता. तिथूनच त्याला अटक करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी जेव्हा तपास सुरु केला तेव्हा त्यांना पहिला संशय या मुलावरच आला. तपासादरम्यान पोलिसांना बाथरुममध्ये रक्तानं माखलेले मुलाचे कपडे मिळाले होते. त्यानंतर तो सोसायटीमधून बाहेर पडताना सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं होतं.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान या अल्पवयीन मुलानं आपला गुन्हा कबूल केला आहे. पण या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

4 डिसेंबरला टाइल्स व्यापारी सौम्य अग्रवाल यांची पत्नी अंजली आणि त्यांची 12 वर्षाची मुलगी मणिकर्णिका यांची चाकू आमि क्रिकेट बॅटनं हत्या केली. ही हत्या नेमकी मुलानं का केली होती याचा सध्या पोलीस तपास करत आहेत.