देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा जमीनदोस्त, मोठ्या पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री पोलिसांनी घेतला ताबा
पुणे : मुलींची देशातील पहिली शाळा पुण्यातल्या (Pune News) ज्या भिडे वाड्यात (Bhide Wada) सुरू झाली होती तो वाडा आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने महानगरपालिकेने जमीनदोस्त केला आहे. गेल्याच महिन्यात सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्ट फेटाळून लावली आणि भिडे वाडा पालिकेला ताब्यात देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे मनपाने (PMC) ऐतिहासिक भिडे वाड्याचा ताबा घेतला. मोठ्या पोलिस बंदोबस्तात (Pune Police) ही मोहिम रातोरात फत्ते केली गेली. आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाईल. वाचा सविस्तर
"तेरी जीत से ज्यादा चर्चे मेरी हार के हैं"; दुःखातून सावरलं, अश्रुंना आवरलं, निवडणुकीत हरवणाऱ्याला भाजप आमदाराचं शायराना अंदाजात प्रत्युत्तर
Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) गृहमंत्री (Home Minister of Madhya Pradesh) नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) दतियामधून विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभूत झाले. काँग्रेसचे (Congress) उमेदवार राजेंद्र भारती (Rajendra Bharti) यांनी त्यांचा 7742 मतांनी पराभव केला. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नरोत्तम मिश्रा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर
Weather Update Today: सोसाट्याच्या वाऱ्यांनंतर दिल्लीत गोठवणारी थंडी, कसं असेल उत्तर भारतातील हवामान? महाराष्ट्रावर परिणाम होणार?
Weather Update Today : सध्या नवे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा (Michong Cyclone) प्रभाव देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये दिसत आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तामिळनाडू (Tamil Nadu), ओडिशासह (Odisha) अनेक राज्यांमध्ये हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, आज म्हणजेच, मंगळवारी (5 डिसेंबर) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar), झारखंडच्या (Jharkhand) अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर
चेन्नईला मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा; इंडिगोकडून रांची-चेन्नई फ्लाईट रद्द, झारखंडहून सुटणाऱ्या ट्रेनही रद्द
Cyclone Michaung Updates: रांची : 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे (Michaung Cyclone) सोमवारी चेन्नई (Chennai) आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates) पडत आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे चेन्नई विमानतळावरील (Chennai Airport) सर्व ऑपरेशन्स 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे हवाई सेवांव्यतिरिक्त, रेल्वे सेवा (Railway Services) रद्द किंवा उशीर झाल्या आहेत. 'मिचॉन्ग' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्री उशिरापासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. वाचा सविस्तर
Cyclone Michaung : आज आंध्र प्रदेशात धडकणार मिचॉन्ग, चक्रीवादळानं दक्षिण भारताला झोडपलं; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
Cyclone Update : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी (Rain Update) पाहायला मिळत आहे. चक्रीवादळ मिचॉन्गमुळे हवामान विभागाने (IMD) हलक्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी केला आहे. चेन्नई (Channai), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) तसेच दक्षिण किनारपट्टी भागात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांच चेन्नईमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे. वाचा सविस्तर
5th December In History: वर्णभेदाविरोधात क्रांती करणारे नेल्सन मंडेला आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन; आज इतिहासात
5th December In History: नेल्सन मंडेला हे नाव कुणाला माहिती नाही असं होऊ शकणार नाही. त्यांनी केवळ दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरोधी लढ्याचे नेतृत्वच केलं नाही तर जगभरात शांती आणि बंधुतेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांच्या विचारसरणीवर चालणाऱ्या मंडेला यांनी अहिंसा आणि सत्याग्रहाच्या जोरावर क्रांती घडवली. त्यांची आज पुण्यतिथी. तसेच सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री राहिलेल्या जयललिता (J. Jayalalithaa) यांचीही आज पुण्यतिथी आहे. वाचा सविस्तर
Horoscope Today 5 December 2023 : आजचा मंगळवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 5 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 5 डिसेंबर 2023, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज मिथुन राशीच्या लोकांच्या ऑफिसमध्ये तणावाचे वातावरण असू शकते. आज विरोधक कन्या राशीच्या लोकांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घेऊया. वाचा सविस्तर