देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका, केंद्रीय गृह सचिवाकडून माहिती
मंगळवारी (15 ऑगस्ट) देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या कैद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे. या माफीच्या तिसऱ्या टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 186 कैद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. (वाचा सविस्तर)
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 21 विधेयके मंजूर; लोकसभेत 44 टक्के आणि राज्यसभेत 63 टक्के कामकाज
संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session 2023) संपले आहे. 20 जुलै 2023 ला अधिवेशनाला सुरुवात झाली होती. अधिवेशनाच्या 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका झाल्या. या अधिवेशनात एकूण 21 विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी केली मंजूर केली.अधिवेशनात लोकसभेत सुमारे 44 टक्के आणि राज्यसभेत 63 टक्के कामकाज झालं. (वाचा सविस्तर)
द्वेषयुक्त भाषण मान्य नाहीच...सुप्रीम कोर्टाने केंद्राला दिले महत्त्वाचे निर्देश
देशभरात होत असलेल्या द्वेषयुक्त भाषणाच्या प्रकरणी (Hate Speech) दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) केंद्राला महत्त्वाचे निर्देश दिले. द्वेषयुक्त भाषण कोणत्याही स्थितीत मान्य करता येणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. या प्रकरणी केंद्र सरकारने एक समिती नेमण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे. (वाचा सविस्तर)
गुजरात-राजस्थानमध्ये पेट्रोलचे दर वाढले, हिमाचलमध्ये स्वस्त; महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत किंचित वाढ झाली आहे. WTI क्रूड ऑईल 0.37 डॉलर्सच्या वाढीसह प्रति बॅरल 83.19 डॉलरवर विकलं जात आहे. तसेच, ब्रेंट क्रूड ऑईल 0.41 डॉलर्सनी वाढून प्रति बॅरल 86.81 डॉलर्सवर व्यापार करत आहे.
(वाचा सविस्तर)
खासदारकी पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला
खासदारपद पुन्हा बहाल झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाडला भेट देणार, आहेत. 12 आणि 13 ऑगस्टला राहुल गांधी वायनाडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. (वाचा सविस्तर)
दिल्लीत हलक्या पावसाच्या सरी, तर उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) सुरूच आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज राजधानी दिल्लीत काहीसा तुरळक पाऊस असेल. येथील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. (वाचा सविस्तर)
भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई यांचा जन्म, आंतरराष्ट्रीय युवा दिन; आज इतिहासात
भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक विक्रम साराभाई (Vikram Sarabhai) यांची आज जयंती आहे. अंतराळ वैज्ञानिक विक्रम साराभाई यांचं भारतीय अंतराळ संशोधनात फार महत्त्वाचं योगदान आहे. ते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि उद्योगपती होते ज्यांनीच भारतात अंतराळ संशोधन सुरू केलं.
(वाचा सविस्तर)
मेष, तूळ, मकरसह 'या' राशीच्या लोकांवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मीन राशीच्या लोकांना डोकेदुखी आणि पोटदुखीसारख्या आजारांनाही सामोरे जावे लागू शकते. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)