India Monsoon Update : संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाला आहे. देशातील विविध राज्यात सध्या पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र, उत्तर भारतातील काही राज्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. अद्यापही उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट कायम असल्याचं चित्र आहे. अशातच भारतीय हवामान विभागानं उत्तर भारतात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 10 जुलैच्या मध्य रात्रीपासून उत्तर भारतात पाूस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं सांगितला आहे. त्यामुळं लवकरच नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.


10 जुलैपासून उत्तर भारतात पाऊस कोसळणार


दरम्यान, देशात ईशान्येकडील भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरस्थिती आहे. त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते आता उत्तर भारतात पाऊस पडणार आहे. 10 जुलै म्हणजे उद्यापासूनच उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा या राज्यात पाऊस पडणार आहे. त्यामुळं तापमानात घट होणार आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 


यापूर्वी 5 जुलैनंतर दिल्लीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण पाकिस्तानपासून कन्व्हर्जन्स झोनपर्यंत पाऊस आला नाही. त्यामुळं पाऊस लांबला आहे. सध्या पाकिस्तान आणि गुजरातमध्ये कन्व्हर्जन्स झोन कायम आहे. त्यामुळं दिल्लीत 10 जुलैनंतर पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.


महाराष्ट्रात पावसाची जोरदार हजेरी 


सध्या राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत आहे. मुंबईसह ठाणे, पालघर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चांगल्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग आला आहे. शेतकरी सध्या पेरणी करत आहेत. चांगल्या पावसामुळं शेतकरी खते खरेदी करत आहेत. खतांच्या दुकानासमोर खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसत आहे. शेतकऱ्यांना बोगस खतांचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. या विरोधात कृषी अधिकारी कारवाई करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या: