अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. परंतु भाजपचे चाणक्य तसेच भाजपच्या वजीराची भूमिका निभवणारे अमित शाह यांचा प्रवास छोटा नाही. एकेकाळी शेअर ब्रोकर असलेल्या अमित शाह यांनी राजकारणात आल्यापासून प्रत्येक निवडणूक जिंकत इथपर्यंतचा प्रवास केला आहे.
अमित शाह यांचा जन्म 1964 साली गुजरातमधल्या एका सधन कुटुंबात झाला. विद्यार्थी नेता म्हणून त्यांची राजकीय इनिंग सुरु झाली. १९८६ साली अहमदाबादमध्ये पहिल्यांदा त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भेट झाली. त्यानंतर मोदी-शाह जोडीने हळूहळू गुजरातच्या राजकारणावरची पकड घट्ट केली.
पाहा कोणतं खातं कोणाकडं?
1989 पासून अमित शाह यांनी 29 निवडणुका लढल्या आहेत. त्यापैकी एकाही निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही. गुजरातच्या सारखेज विधानसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे एकाचवेळी 12 खाती सांभाळण्याचा त्यांना अनुभव आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून शाह यांनी दोन वेळा भाजपला लोकसभा निवडणूक जिंकून दिली आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी लोकसभा काबीज केली. या राजकीय रणसंग्रामात मोदींचा उजवा हात म्हणून अमित शाह यांनी काम केले.
अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, गुजरात, त्रिपुरा आणि आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. परंतु दिल्ली, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
भाजपचे नवे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? | नवी दिल्ली | ABP Majha