नवी दिल्ली: सर्वांसाठी घर या महत्त्वपूर्ण योजनेसाठी मोदी सरकार नियमांमध्ये सुधारणा करत आहे.  सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आता सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

घर खरेदीसाठी नोकरदारांना त्यांचा हक्काचा पैसा म्हणजे भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधील तब्बल 90 टक्के पैसे काढता येणार आहे.

इतकंच नाही तर पीएफच्या रकमेतून गृहकर्जाचे हप्तेही भरता येणार आहेत. लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होणार आहे.

घर घेण्यापूर्वी या गोष्टी जरुर लक्षात ठेवा


नव्या नियमानुसार ईपीएफ योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला 10 सदस्यांची को-ऑपरेटीव्ह सोसायटी स्थापन करावं लागले.

सरकारने ईपीएफ योजना 1952 च्या नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी राज्यसभेत दिली.

"ईपीएफधारक 10 सदस्यीय सहकारी सोसायटीची स्थापना करुन या योजनेअंतर्गत त्यांच्या पीएफ रकमेतील 90 टक्के रक्कम घर खरेदीसाठी, बांधकामासाठी काढू शकतात. इतकंच नाही तर पीएफच्या रकमेतून गृहकर्जाचे हप्तेही भरता येतील", असं बंडारु दत्तात्रय यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पडून असलेला पीएफ गहाण ठेवा, घर खरेदी करा !

पहिलं घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, पंतप्रधान आवास योजनेत भरघोस सूट!

'या' कारणांसाठी तुम्ही पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकाल

VIDEO: गृहकर्जावरील व्याजदरात 3 ते 4 टक्के कपात : पंतप्रधान

हक्काचं घर मिळवून देण्यासाठी योजना