श्रीनगर : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी जम्मू आणि काश्मीर (J&K) मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. जिथे त्यांनी मोदी सरकारने आणलेल्या नवीन सुधारणांवर प्रकाश टाकक टीका केली. मी काल मंदिरात गेलो होतो आणि तिथं त्रिशक्ती होती, दुर्गा जी, सरस्वती जी आणि लक्ष्मी जी. या तीन शक्ती आहेत. भाजपने नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे आणले आहेत. यावेळी मोदी सरकारच्या निर्णयांमुळे देवी लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा यांच्या शक्तींवर परिणाम झाला असल्याचे राहुल गांधी म्हणाले. भाजपने जम्मू-काश्मीरवर हल्ला करून कमकुवत केलं आहे, त्यांनी तुमचे राज्यत्व हिरावून घेतलंय असेही ते म्हणाले.


काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी म्हणाले, "काल जेव्हा मी वैष्णो मातेच्या मंदिरात गेलो होतो, तेव्हा तिथे त्रिशक्ती होत्या - दुर्गा जी, लक्ष्मी जी, सरस्वती जी. 'दुर्गा जी' ज्याला आपण दुर्गा माँ म्हणतो; दुर्गा हा शब्द 'दुर्ग' वरून आला आहे; 'दुर्गा मा' म्हणजे संरक्षण करणारी शक्ती.


ते पुढे म्हणाले, "लक्ष्मी माँ म्हणजे 'ध्येय' पूर्ण करणारी शक्ती; जर तुमचे ध्येय पैसे असेल तर तुम्ही जे सांगितले ते देखील खरे आहे. जर तुमचे ध्येय दुसरे काही असेल, तर ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला मिळणारी शक्ती म्हणजे 'लक्ष्मी माँ'.


राहुल गांधी म्हणाले, "सरस्वती जी ती शक्ती आहे, ज्याला आपण विद्येची देवी/शक्ती, ज्ञान म्हणतो. या तीन शक्ती आहेत. जेव्हा या त्रिशक्ती घरात किंवा देशात असतात तेव्हा देशाची प्रगती होते. भारतात नोटाबंदी आणि जीएसटीमुळे मा लक्ष्मीची शक्ती कमी झाली आहे की वाढली आहे? शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन काळ्या कायद्यांमुळे दुर्गा मातेची शक्ती कमी झाली की वाढली? जेव्हा भारतातील प्रत्येक संस्था, महाविद्यालय आणि शाळेत आरएसएसमधील व्यक्ती बसवला जातो, तेव्हा आई सरस्वतीची शक्ती कमी होते की वाढते? उत्तर आहे, कमी होते.


ते म्हणाले की, जे स्वतःला हिंदू (भाजप) म्हणवतात, ते वैष्णो देवी मंदिरात जाऊन डोके टेकवतात आणि त्याच त्रिशक्तीचा अपमान करतात. स्वतःला धार्मिक म्हणवता आणि मग त्याच शक्तींना दडपण्याचं काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले.